मुले स्वयं अध्ययन व अधिक गतीने शिकावित, यासाठी केंद्र शासनाने निपुण भारत योजने अंतर्गत जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण विचार हा कार्यक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी आश्रमशाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, वसतिगृह अधीक्षक यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थीनी शाळा पातळीवर, वर्ग पातळीवर याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन पुणे विभागाचे प्रशिक्षण सहाय्यक राहुल गुरड यांनी केले आहे. ( Training Program for Ashram School Teachers at Talegaon Dabhade Rahul Gurd )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हे उद्दीष्ट साध्य करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या निपुण भारत या योजनेच्या धर्तीवर पुणे विभागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षकांसाठी प्रशिक्षण घेण्यात येत आहेत.
त्यानुसार पुणे विभागाचे प्रशिक्षण सहाय्यक राहुल गुरड यांच्या संनियंत्रणाखाली पुणे विभागातील आश्रमशाळांतील शिक्षकांच्या बॅच क्रमांक 11 आणि 12 मधील एकूण 100 शिक्षकांसाठी 26 ते 29 डिसेंबर 2022 दरम्यान पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे ) येथे चार दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षणाच्या शुभारंभाप्रसंगी गुरड हे बोलत होते.
पुढे बोलताना गुरड म्हणाले की, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नंद कुमार यांच्या संकल्पनेतून, पुणे विभागाचे प्रादेशिक उपसंचालक खुशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकरिता निश्चितच फायदा होईल.
या प्रशिक्षणाकरिता सुलभक म्हणून विजय फापाळे ( पुणे), संतोष राठोड (उस्मानाबाद ), रुद्राक्ष वैरागकर, किशोर जाधव, किशोरकुमार शिंदे, आशिष कांबळे (सोलापूर ) आदि परिश्रम घेत आहेत.
अधिक वाचा –
– ‘पोल्ट्री व्यवसायिकांची अवास्तव घरपट्टी कमी करा’, मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेची एकमुखी मागणी
– आता घरबसल्या आणि मोबाईलवर मिळवा ग्रामपंचायतींचे दाखले, जाणून घ्या