Dainik Maval News : मावळ तालुका तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने हादरला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दिनांक 6 ते 9 जुलै 02024 रोजी ही घटना घडली. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. तालुक्यात पहिल्यांदाच अशी धक्कादायक घटना घडली असल्याने खळबळ माजली आहे.
नेमके संपूर्ण प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन अंतर्गत विवाहित महिला बेपत्ता असल्यावरून मिसिंग प्रकरण दाखल करण्यात आलेले होते. सदरच्या चौकशीमध्ये बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्याच्या निमित्ताने तिला आपल्या मित्रासोबत ठाणे येथे पाठविले होते. सदर ठिकाणी उपचारादरम्यान नमूद महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रियकराच्या मित्राने सदरची डेड बॉडी आणि महिलेच्या दोन्ही मुलांना परत घेऊन येवून तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक ९ जुलै २०२४ रोजी पहाटे प्रियकराच्या मदतीने सदरची डेड बॉडी नदीमध्ये टाकून दिली. यावेळी दोन्ही मुलांनी सदरचा प्रकार पाहून रडू लागल्यामुळे त्यांना देखील जिवंतपणे नदीमध्ये टाकून दिले. या अनुषंगाने तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून प्रियकर गजेंद्र दगडखैर व त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना अटक करण्यात आलेली असून माननीय न्यायालयामध्ये पाठविण्यात आलेले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगांव एमआयडीसी हे करीत आहेत.
गरोदर विवाहित महिलेचा गर्भपात करता मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी महिलेचा मृतदेह नदीत टाकताना महिलेची दोन्ही मुले आरडाओरडा करत असल्याने मुलांना जिवंत नदीत फेकले. 6 ते 9 जुलै 2024 दरम्यान समता कॉलनी वराळे येथे घडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये मयत महिलेच्या वडिलांनी सोमवारी (दि.22) फिर्याद दिली. भारतीय न्याय संहिता 2023 कलम- 103 (1),105, 238. 90, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत 25 वर्षीय विवाहित महिला, 5 वर्ष व 2 वर्ष या तिघांची हत्या झाली आहे. गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (वय 37, रा. समता कॉलनी, वराळे ता. मावळ जि.पुणे) रविकांत भानुदास गायकवाड (वय 42, रा. डॉन बास्को कॉलनी ईश्वरानंद सोसायटी, सावेडी ता. जि. अहमदनगर, गर्भात करणारी एजंट महिला (पुर्ण नाव पत्ता माहित नाही), कळंबोली मधील संबंधित डॉक्टर (पूर्ण नाव माहीत नाही) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यांच्यावतीने इंदोरी हद्दीत इंद्रायणी नदीपात्रात मृतदेह शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.