Dainik Maval News : आंबा, लिंब, बाभूळ, गुलमोहर अशा झाडांचे १३ टन वजनी इमारती लाकूड आणि त्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक असा सुमारे ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल शिरोता वनपरिक्षेत्रामार्फत जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (दिनांक २६ ऑक्टोबर) रोजी जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मुंढावरे (ता. मावळ) गावाच्या हद्दीत एक ट्रक (क्र. एमएच ०४ सीपी ९५५२) अवैधरित्या इमारती लाकडाची वाहतूक करीत असताना वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले.
महाराष्ट्र सॉ मिल, दावरवाडी, तालुका पैठण येथून मुंबईकडे हे लाकूड घेऊन जाण्यात येत होते. वनरक्षक डी.पी. चव्हाण आणि वनपाल सागर चुटके यांनी या ट्रकच्या मागील हौदाची झडती घेतली असता त्यांना आतमध्ये १३ टन लाकूड आढळुन आले.
तत्काळ वन गुन्हा नोंदवून वरील वनोपजासह वाहन जप्त करून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी जप्त मुद्देमालाबाबत तपास सुरू असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सोमनाथ ताकवले यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘आम्ही पक्षाचा आदेश मानणार, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार’ ; तळेगाव भाजपा पदाधिकाऱ्यांचा सुनिल शेळकेंना पाठींबा
– मावळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ‘या’ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल । Maval Vidhan Sabha
– मावळात शरद पवारांचा अजितदादांना धक्का ! अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचं काम करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश