Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर केबल वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला भीषण आग लागली. आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. परंतु संपूर्ण ट्रक जळून साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मंगळवारी (दि.४) ही घटना घडली.
ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस, बोरघाट पेट्रोलिंग, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीम यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. आटोक्यात येत नसल्याने खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
- बोरघाटातील बोगद्यात ह्या ट्रकने पेट घेतला होता, त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली असून बोगद्यात ही घटना घडल्याने मोठा दुर्धर प्रसंग ओढवला होता. ट्रकच्या टायर आणि इतर साहित्याला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्याने अंधारात काहीच दिसत नव्हते.
बोगद्यातील इतर वाहनातील प्रवाशांना श्वसनाचा त्रास जाणू लगला होता. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती. तर सर्वच यंत्रणांनी आग विझविण्यासोबत इतर वाहनातील प्रवाशांना सुरक्षितपणे धुरापासून श्वसनास त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक