मावळ विकास मंडळ संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन जवण आजिवली आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार मंच तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून पवन मावळातील महिला पालकांसाठी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार मंचच्या संस्थापक अध्यक्षा आणि शाळेच्या संचालिका स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांनी यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले होते.
तसेच प्रमुख अतिथी म्हणून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा वैशालीताई दाभाडे, इनरव्हील रोटरी क्लब सदस्या स्वातीताई दाभाडे आणि माळवाडीच्या सरपंच पल्लवीताई दाभाडे पाटील आदी यावेळी उपस्थित होत्या. वर्षाराणी दगडे, जया पाटील यांचा सत्कार स्नेहल बाळसराफ यांच्या हस्ते करण्यात आला. ( Turmeric Kunku Ceremony And Competitions For Female Parents of Pavan Maval At Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील महिलांना मार्गदर्शन करताना बाळसराफ यांनी सार्वजनिक हळदीकुंकू माध्यमातून महिलांचे संघटन करणे, हा हेतू असल्याचे सांगून महिलांनी कन्या आणि पुत्र यांच्यात कोणताही फरक न करता मुलींना शिक्षण दिले पाहिजे, त्यांना पायावर उभे केले पाहिजे असे सांगून जोपर्यंत महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही, तोपर्यंत समाजामध्ये त्यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अन्याय होतच राहतील. त्यामुळे महिलांना आत्मविश्वास देण्याची नितांत गरज आहे, असे मत मांडले.
यानंतर मा उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे यांनी ग्रामीण भागातील शिकत असलेल्या विद्यार्थिनींचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. महिलांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण या विषयी खंत व्यक्त केली आणि कॅन्सर होऊ नये म्हणून HPV VACCINATION CERVICAL CANCER सर्व विद्यार्थिनींना मोफत देण्यात येईल असे आश्वासन दिले.
स्वाती दाभाडे आणि माळवाडीच्या सरपंच पल्लवी दाभाडे यांनीही शिक्षणाचे महत्त्व आणि आपल्या समोर आलेल्या सम्यस्या यांना कशा प्रकारे सामोरे जावे, याविषयी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नेहमीप्रमाणेच याही वर्षी देखील संगीत खुर्ची आणि उखाणे या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. त्यासाठी महिलांचा प्रतिसाद उत्तम होता.
संगीत खुर्चीमध्ये प्रथम क्रमांक मनीषा घरदाळे, द्वितीय क्रमांक मंदा लायगुडे तर तृतीय क्रमांक स्वाती शिंदे यांनी मिळवला. तसेच उखाणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रीती माव्हानकर, द्वितीय क्रमांक दिपाली शिंदे, तृतीय क्रमांक सुषमा ओव्हाळ यांनी पटकावला. स्वाती दाभाडे आणि पल्लवी दाभाडे तसेच वर्षाराणी दगडे यांनी शाळेच्या प्रगतीविषयी आणि विद्यार्थ्यांविषयी समाधान व्यक्त करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ( Turmeric Kunku Ceremony And Competitions For Female Parents of Pavan Maval At Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali )
शाळेचे मुख्याध्यापक रमेश आरगडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी देशपांडे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन वर्षा बारबोले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ आदर्श शिक्षक गणेश पाटील आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थीनी यांनी मोलाचे सहकार्य केले.
अधिक वाचा –
– दुधिवरे गावात शासकीय योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम; ग्रामस्थांनी ई-श्रम कार्ड, आभा कार्ड योजनांचा घेतला लाभ
– आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतन शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत ‘आयडियल स्टडी ॲप’
– पालकांनो, मुलं सांगतात ती कारणे खरी की खोटी हे एकदा तपासून पाहा; अन्यथा ‘असा’ शोक करण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते