भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मुंबई-बंगळूर महामार्गावर सेंट्रल चौकाच्या पुढे मुकाई चौकाकडे जाताना हा अपघात घडला. याप्रकरणी मृत तरूणाचा मित्र ललीत कुमार (वय 19, रा. सेन्ट्रल चौक देहुरोड) याने फिर्याद दिली आहे. त्यावरून असीम (पुर्ण नाव माहीत नाही) वय 24, रा. मामुर्डी देहुरोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 7 वाजता मुंबई-बेंगलोर हायवेवर ईदगाह मज्जिद समोर हा अपघात झाला होता. अपघातात गंभीर जखमी तरूण मृत पावल्याने याप्रकरणी दिनांक 27 एप्रिलला फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहुरोड पोलिस ठाण्यात आरोपीवर भादवि कलम 279, 337, 304 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( twenty year old youth died in collision with speeding bike )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद तारखेला मुंबई-बेंगलोर हायवेवर सेन्ट्रल चौकाच्या पुढे मुकाई चौकाकडे जाताने ईदगाह मज्जिद समोर मोटारसायकल चालक असीम याने त्याच्या ताब्यातील दुचाकी बेदरकारपणे, अतिवेगाने आणि निष्काळजीपणाने चालवली त्यामुळे फिर्यादी ललीत कुमार याचा मित्र सूर्य प्रताप (वय 20) गंभीर जखमी झाला आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उप निरिक्षक भंडारे हे करत आहे.
अधिक वाचा –
– मावळात हे चाललंय काय ? जुन्या वादातून तरूणावर कोयत्याने वार, वाचवायला गेलेल्या तरुणावरही हल्ला । Kamshet News
– पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सुटी न दिल्यास ‘इथे’ करा तक्रार । Pune News
– महाविकासआघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून पवनानगर बाजारपेठ भागात संजोग वाघेरे यांच्या मशाल चिन्हाचा जोरदार प्रचार । Pavananagar