पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. खेड तालुक्यातील पाईट जवळील आडगाव येथे पोहायला गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवम शंकर गोपाळे (वय 15 वर्षे, रा. आडगाव) आणि सार्थक राजेंद्र ढोरे (वय 15 वर्षे, रा. आडगाव, मुळ गाव भोसरी) असे मृत पावलेल्या दोन मुलांची नावे आहेत. ( Two Children Drowned Death In Khed Rajgurunagar Taluka Of Pune District )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी हा अपघात घडला. वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांना अपघाताची माहिती देण्यात आली. त्यानंतर सोमवारी (31 ऑक्टोबर) सकाळीच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी सर्च ऑपरेशन राबवले आणि दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
View this post on Instagram
पोलीस नाईक गणेश वाडेकर, पोलीस हवालदार विठ्ठल रेगडे, पोलीस पाटील गणेश गोपाळे, सरपंच प्रकाश गोपाळे यांसह रेस्क्यु टीम वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांचे निलेश गराडे (संस्थापक वन्यजीव रक्षक मावळ संस्था), गणेश निसाळ(अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन सर्च अँड रेस्क्यु टीम वन्यजीव रक्षक मावळ संस्था), भास्कर माळी, सत्यम सावंत, विकी दौंडकर, अवी कारले , जिगर सोलंकी, विनय सावंत, अनिश गराडे आदींनी हे सर्च ऑपरेशन पुर्ण केले.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; 1 ठार, 2 गंभीर
– Video : मावळ तालुक्यात भात कापणीला वेग, शेतकऱ्यांकडून यंत्राद्वारे भात कापणीस प्राधान्य