Dainik Maval News : एका अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील चालकाचा मृत्यू झाला असून सहप्रवासी मुलगा गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी, दि. 4 ऑगस्ट रोजी रात्री पाऊणे आठच्या सुमारास भगतवस्ती जवळ, चांदखेड येथे हा अपघात झाला. याप्रकरणी सोमवारी प्राप्त फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहम संतोष गायकवाड (वय, 23, रा. कासारसाई पाचाणे रोड, चांदखेड, ता. मावळ) याने याबाबत फिर्याद दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी प्राप्त फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 106 (1), 281,125 (अ), 125 (ब), 324 (2) आणि मोटार वाहन कायदा 184, 134 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ जो 12 वर्षांचा आहे, तो आणि कामगार नितेश किसन कोकाटे (वय 20) हे दोघेही दुचाकीवरून चांदखेड येथून दळण घेऊन घरी परतत होते. तेव्हा घरी येत असताना एका अज्ञात वाहन चालकाने भगतवस्ती येथे त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ( Two-wheeler driver dies after being hit by an unknown speeding vehicle )
अपघातात नितेश किसन कोकाटे हा मृत पावला असून फिर्यादी यांचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातास कारणीभूत वाहनचालक अपघातानंतर घटनास्थळाहून पसार झाला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोउपनि पारखे हे करित आहेत.
अधिक वाचा –
– मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय ! राज्यातील ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार, केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमणार
– सांस्कृतिक कार्य विभागाकडून यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त स्पर्धेची घोषणा, 31 ऑगस्टपूर्वी करा अर्ज, वाचा अधिक
– बाळा भेगडे यांची तळेगाव पोलिसांत तक्रार, मराठा मोर्चाचे विनोद पोखरकर यांच्यावर गुन्हा दाखल । Bala Bhegade News