Dainik Maval News : ओझर्डे (ता. मावळ) येथील दोन वर्षाच्या रायाजी सुधीर घारे याने महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला असलेला किल्ले साल्हेर सर करून नवा विक्रम बनविला आहे. याबद्दल चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अवघे 2 वर्षे 10 महिने इतके वय असणाऱ्या रायाजीने त्याच्या कुटुंबीयांसमवेत शनिवारी (दि.11) साल्हेर किल्ला सर केला. महत्वाचे म्हणजे कुटुंबीय ट्रेकर असल्याने लहान वयातच रायाजीने आतापर्यंत 14 किल्ले सर केले असून साल्हेर ही त्याची 15वी मोहीम होती.
नाशिक जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या रांगेत असलेला साल्हेर किल्ला ५१७५ फूट उंच आहे. पायथ्याशी असलेल्या सरदार सूर्याजी काकडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सकाळी पाऊणे आठ वाजता चढाईला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी बारा वाजता रायाजी किल्ल्यावरील सर्वात उंच परशुराम मंदिर ठिकाणी पोहोचले.
पुणे शहरातील संडे हायकर्स ह्या संस्थेच्या सदस्यांनी या लहानग्या ट्रेकरचे कौतुक केले. रायाजीचे आईवडीलांनी त्याला मोहीमेत सहकार्य केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंदर मावळातील बेलज – राजपुरी रस्त्याची प्रचंड दुरावस्था ! पर्यटन व्यवसायावर होतोय परिणाम । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’
– मावळवासियांना मोठा दिलासा ! वडगाव येथे कायमस्वरुपी उपविभागीय कार्यालय सुरु होणार । Maval News