मावळ तालुक्यातील पुसाणे गावात पोलिसांनी धडक कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या आणि अवैधरित्या गांजा या अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या दोन तरुणांना रंगेहात अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिस नाईक गणेश बाबु गिरीगोसावी ( ब.नं. ११२१, नेमणुक खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, चिंचवड, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींवर शिरगाव पोलिसांत भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ व एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सितमाला बंगल्या समोरील रोडवर, मौजे पुसाणे, ता. मावळ, जि. पुणे इथे ही कारवाई कऱण्यात आली. ( Two youths arrested with country-made pistol and narcotic ganja )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी; आरोपी क्रमांक १ – मयुर अनिल घोलप (वय २९ वर्षे रा. लक्ष्मीगंगा अर्पाटमेंट, फलॅट नं. १९, पागेची तालीम, चिंचवडगाव, सध्या रा. पुसाणे, ता. मावळ, जि. पुणे) आणि
आरोपी क्रमांक २ – शंभू संजय गंगावणे (वय २१ वर्षे रा. धोंडेवाडी, पाचवड फाटा, कराड जिल्हा सातारा आरोपी अटक आहे) या दोघांनाही अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १८ मार्च रोजी सायंकाळाच्या सुमारास आरोपी क्रमांक १ आणि २ यांनी ६५,००० रुपये किंमतीची हिरो कंपनीची डेस्टिनी १२५ मोपेड गाडी (नंबर एम.एच.१४ / एच.टी/ ६७७२) यावरुन येऊन मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांचे कार्यालय जावक क्रमांक १९०४/२०२३ दिनांक ०६/०३/२०२३ रोजीचे आदेशान्वये पिंपरी, चिंचवड शहरात पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक ०७/०३/२०२३ रोजी ००:०१ वा. पासून ते दिनांक २०/०३/२०२३ रोजी २४:०० वा. पर्यंत कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील दगड अथवा शस्त्रे, अस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, लाठी, बंदुका किंवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरात येईल, अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे अथवा बाळगणे बाबत मनाई आदेश असताना सदर आदेशाचा भंग करुन, आरोपी क्रमांक १ मयूर घोलप यांने ४०,००० रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल असे कोणताही कायदेशीर परवाना नसताना, आपले कब्जात अवैधरित्या बाळगले असताना मिळुन आला.
तसेच आरोपी क्रमांक २ शंभू गंगावणे याच्या ताब्यामध्ये एकुण ३१,००० रुपये किंमतीचा १२४० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने बेकायदेशीररीत्या विक्री करीता कब्जात बाळगताना मिळुन आला. आरोपी क्रमांक १ आणि २ यांनी आपले कब्ज्यात एकुण १,३६,००० रुपयांचा माल बाळगला असताना मिळुन आले. या प्रकऱणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना रंगेहात अटक केली असून पुढील तपास पोना धायगंडे हे करत आहेत.
अधिक वाचा –
– कार्ला फाटा जवळ भीषण अपघात; मनसे पदाधिकाऱ्यांकडून अपघातास कारण ठरलेल्या गाडी चालकाला जागेवरच ‘प्रसाद’
– तळेगाव दाभाडेतील पिंकेथॉन रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या उपस्थितीत मॅरेथॉनचे उद्घाटन