Dainik Maval News : हवाई वाहतूक मंत्रालयाच्या उडान ५.५ योजनेत सागरी विमान आणि हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला आहे. येत्या डिसेंबरअखेर देशातील १५० मार्गांवर सागरी विमान सेवा सुरू करण्याचा मानस आहे. ‘एमएडीसी’ने (महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळ) राज्यातील ८ ठिकाणांहून सागरी विमान सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव भारतीय विमानतळ प्राधिकरण व हवाई वाहतूक मंत्रालयाला सादर केला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पवना धरणाचा समावेश आहे. ( Udan scheme Sea plane service at 150 locations in India Eight locations in Maharashtra including Pawana Dam )
उडान ५.५ योजना : Udan 5.5 scheme
समोर आलेल्या माहितीनुसार, सागरी विमान सेवा पहिल्या टप्प्यात केरळ, आंध्र प्रदेश, अंदमान, लक्षद्वीप या भागांतून सुरू होईल. कॅनडातील ‘डे हविलंड एअरक्राफ्ट ऑफ कॅनडा लिमिटेड’ कंपनीच्या विमानांचा यासाठी वापर होईल. इंडिगो व पवनहंस या कंपन्या देशात सागरी विमान सेवा सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत. ही सेवा ‘व्हीजीएफ’ (व्हाएबिलिटी गॅप फंडिंग) अंतर्गत असल्याने प्रवाशांना अवघ्या दीड ते दोन हजार रुपयांत सागरी विमानाने प्रवास करता येईल.
महाराष्ट्रातील निवडलेली ठिकाणे
१) धोम धरण (वाई)
२) गंगापूर धरण (नाशिक)
३) खिंडसी धरण (नागपूर)
४) कोराडी धरण (मेहकर)
५) पवना धरण (पवनानगर, पुणे)
६) पेंच धरण (पारशिवनी, नागपूर)
७) गणपतीपुळे (रत्नागिरी)
८) रत्नागिरी
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
– महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती ! २० हजार ७८७ कोटींची तरतूद ; बारा जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी. लांबीचा द्रुतगती मार्ग
– मावळ लोकसभा क्षेत्रातील पनवेल विमानतळ सप्टेंबरपासून सुरू होणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके