एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पडलेली फूट आणि राज्यात उभा राहिलेला सत्तासंघर्ष यातून शिवसेना नेमकी कुणाची आणि धनुष्यबाण नेमकं कुणाला मिळणार, यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीची आजची तिसरी तारिख होती. 10 जानेवारी, 17 जानेवारी आणि त्यांनंतर आज (शुक्रवार, 20 जानेवारी) रोजी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर याप्रकरणी सुनावणी झाली.
शुक्रवारी दोन्ही पक्षकारांनी त्यांचे युक्तीवाद पुर्ण केले. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने यावर आज कोणताही निर्णय न देता सोमवार (दिनांक 23 जानेवारी) रोजी लेखी उत्तरे सादर करण्याची सुचना केली आहे. तसेच या प्रकरणी आता 30 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ( Uddhav Thackeray vs Eknath Shinde Shiv Sena Symbol Battle In Election Commission Election Commission Of India )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सुमारे चार तास चाललेल्या आजच्या सुनावणीत दोन्ही गटांकडून जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले. तसेच दोन वेळा दोन्ही पक्षकारांत खटकेही उडाले. आधी ठाकरे गटाकडून कपील सिब्बल, देवदत्त कामत आणि अनिल तिवारी यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि मनिंदर सिह यांनी त्यांची बाजू मांडली.
मात्र, आज केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणताही निकाल न देता, दोन्ही पक्षांना त्यांची उत्तरे लेखी स्वरुपात सादर करण्यात सांगितले आहे. सोमवारी उत्तरे लेखी स्वरुपात सादर करण्याची आहे. तसेच याबाबत आता पुढील सुनावणी 30 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे, शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाला मिळणार याचे उत्तर 30 जानेवारी रोजी मिळणार की नाही, की पुन्हा काही दिवस सुनावणी आणि इतर प्रक्रिया सुरु राहणार, हे पाहावे लागेल. मात्र, आज कोणताही निकाल लागला नसून ही प्रक्रिया आता लांबली असल्याचे दिसत आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! महाराष्ट्राच्या माजी आरोग्यमंत्र्यांच्या गाडीचा अपघात; गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल
– नाणेघाटात तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्याचा थरार! शिवदुर्ग टीमची साहसी कामगिरी