मावळ तालुक्यातील सांगवडे गावात आज (दि. 11 एप्रिल) एका युवकाचा पवना नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हा अपघात उघडकीस आला. आर्यन अविनाश भोसले (वय 19, रा. काळेवाडी) असे पवना नदीत बुडून मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन हा त्याच्या तीन मित्रांसोबत सांगवडे येथे आला होता. दुपारी ते चौघेही पवना नदीl पोहण्यासाठी उतरले. त्यातील तिघे नदीकाठी पोहत होते, तर आर्यन नदीच्या मध्यभागी गेला होता. तेव्हा पाण्यातील जलपर्णीत आणि गाळात तो फसला. आर्यनला बुडताना पाहून त्याच्या मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. ( Unfortunate Accident Youth Drowned In Pavana River at Sangwade Village Maval )
अखेर त्याच्या मित्रांनी 112 टोल फ्री क्रमांक (आपत्कालीन प्रतिसाद पथक) फोन करून घटनेची माहिती दिली. आपत्कालीन पथकाने तातडीने शिरगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांना मदतीसाठी पाचारण केले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे आपदा मित्र निलेश गराडे, विनय सावंत, अनिश गराडे, सार्थक घुले, सर्जेस पाटील यांनी पवना नदीतून आर्यनचा मृतदेह बाहेर काढला. पुढील तपास शिरगाव पोलिस करत आहेत.
अधिक वाचा –
– मोठी कारवाई! पुणे जिल्ह्यात ‘या’ दोन ठिकाणी 65 लाख रुपयांची रोकड आणि वाहन जप्त । Pune News
– ‘आम्हीच बनवलेल्या रस्त्यांवरून येऊन आम्हाला शिव्या घालू नका.. बारणे 3 लाख मताधिक्याने विजयी होतील’ – उदय सामंत
– वर्षानुवर्षांची पायपीट थांबणार.. कळकराई-मोग्रज रस्त्याला वनविभागाचा हिरवा कंदील! कळकराईकरांना गुढीपाडव्याला गोड भेट