Dainik Maval News : महाळुंगे एमआयडीसी हद्दीतील मौजे वराळे येथील मे. कैलाश स्टील कंपनीचे मॅनेजर यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि.20) घडली. सकाळी साधारण 10.50 च्या सुमारास मौजे वराळे (ता. खेड) येथील मे. कैलाश स्टील कंपनीच्या आवारात सदर कंपनीचे मॅनेजर अजय विक्रम सिंग (रा. हिंजवडी) यांच्यावर काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन आलेल्या व हेल्मेट घातलेल्या दोन अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरुन जिवे मारण्याचे उद्देशाने गोळीबार केला.
अज्ञात आरोपींनी त्यांच्या जवळील पिस्तुलाने 2 गोळ्या झाडून सिंग यांना गंभीर जखमी केले व त्यानंतर वराळे – भांबोली गावाच्या दिशेने पळुन गेले. याबाबत कंपनीचे सुपरवायजर यांनी महाळुंगे पोलीस स्टेशन येथे येऊन सदर गुन्ह्याची फिर्याद दिली आहे. त्यावरुन महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात व्यावसायिक अर्थिक देणे-घेणे किंवा खंडणी या कारणावरून सदर गुन्हा घडल्याची बाब निर्दशनास आली नाही, यामुळे गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन डॉ. शशिकांत महावरकर – सह-पोलीस आयुक्त, वसंत परदेशी – अपर पोलीस आयुक्त, संदिप डोईफोडे – पोलीस उप आयुक्त गुन्हे, डॉ. शिवाजी पवार – पोलीस उप आयुक्त, विशाल हिरे – सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, राजेंद्रसिंह गौर – सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग, नितीन गिते – वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन, जितेंद्र कदम – पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा – युनिट 3, प्रविण कांबळे – पोलीस निरीक्षक (गुन्हे), महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याकरीता 10 पथके स्थापन करुन तपास सुरू केला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
– ‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
– मावळच्या विकासासाठी कटिबद्ध, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे