Dainik Maval News : वडगाव मावळची भूमी मराठा साम्राज्याची केवळ प्रतीक नसुन भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक आहे. मला तुम्ही परत बोलवा मी नक्की येईल, तसेच या ठिकाणाचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून आपण विकास करू, असे उद्गार केंद्रीय दुरसंचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काढले. ते मंगळवारी (दि.२८) वडगाव मावळ येथे बोलत होते.
- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी वडगाव मावळ येथील श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या स्मारकाला सदिच्छा भेट दिली व वडगाव ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी, तहसीलदार विक्रम देशमुख, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम व नागरिक उपस्थित होते.
एक-एक मावळा जमवून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. सुरुवातीला अवघे २० किल्ले असताना पराक्रमाची शर्थ करीत आणि गनिमी कावा तंत्राचा अवलंब करून अत्यंत कमी काळात ३६५ किल्ल्यांचे स्वराज्य विस्तारित करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या छत्रपती शिवरायांकडे होते. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून अनेक सरदारांनी अटकेपार घोडदौड केली, असे सांगून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पानिपतच्या रणसंग्रामाला उजाळा दिला.
सोबत, इथल्या वाड्याचा दगड अन् दगड आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देत असल्याचे सांगून राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजीराजे यांच्या संकल्पनेतील स्वराज्य पुढे नेण्याचे काम अनेक सरदारांनी केले. त्यात श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचे योगदान बहुमोल असल्याचेही मंत्री सिंधिया यांनी आवर्जून सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम पूर्ण ; लवकरच भव्य सोहळ्यासह होणार लोकार्पण
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
– पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मावळातील सात मल्लांनी पटकाविली पदके ; तीन पैलवानांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड