Dainik Maval News : श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे जगदगुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र भंडारा डोंगर मार्गावर शनिवारी (दि.8) भव्य दिंडी निघणार आहे. त्यामुळे सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेदरम्यान तळेगाव-चाकण महामार्गावरील वाहतूक वडगाव फाटा ते एचपी चौक बंद राहणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी चाकण-तळेगाव रस्त्यावरील या दिंडीमध्ये येलवाडीमार्गे देहूगाव ते भंडारा डोंगर मार्गावरील दिंडीत वारकरी मोठ्या संख्येने सहभागी असतील. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता मार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वाहतूक उपायुक्त बापू बांगर यांनी घेतला आहे.
असे आहे वाहतूक नियोजन :
1. मुंबईकडून एचपी चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहतुकीस सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रवेश बंद
पर्यायी मार्ग : सर्व वाहने वडगाव फाटा, वडगाव कमान, तळेगाव एमआयडीसी मार्गे नवलाख उंब्रे बधलवाडी भामचंद्र डॉगर -भांबोली फाटा- एचपी चौकमार्गे पुढे
इतर हलकी वाहने : इंदोरी वायपास जांभवडे फाटा जाधववाडी- नवलाख उंब्रे – शिंदे वासुलीमागें एच.पी. चौक मार्गे पुढे.
2. चाकण-तळेगाव रस्त्यावर एचपी चौकाकडून तळेगावमार्गे मुंबईकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक बंद
पर्यायी मार्ग : एच.पी चौक – भांबोली फाटा-भामचंद्र डोंगर- बधलवाडी-नवलाख उंग्रे- तळेगाव एमआयडीसीमार्गे पुढे.
3. देहूफाटा ते परंडवाल चौक मार्गावर सर्व जड, अवजड वाहतुकीस प्रवेश बंद
पर्यायी मार्ग : देहफाटा एच.पी. महिंद्रा सर्कलमार्गे आयटी पार्क चौक- काळोखे पाटील चौक परंडवाल चौकमार्गे पुढे
4. परंडवाल चौक ते देहूफाटा चौक मार्गावर सर्व जड-अवजड वाहतुकीस प्रवेशबंदी
पर्यायी मार्ग : परंडवाल चौक-काळोखे पाटील चौक आयटी पार्क चौक एचपी चौक महिंद्रा सर्कलमार्गे पुढे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन