तिकोणा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा दिनकर सुतार यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामस्थांच्या एकविचाराने ठरल्याप्रमाणे ताराबाई बोडके यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंच पदासाठी विशेष बैठक बोलावून निवडणूक घेण्यात आली. यावेळी उषा सुतार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची तिकोणा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काले मंडल अधिकारी सचिन कोकाटे यांनी काम पाहिले. तर, मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंतराव मोहोळ, माजी सरपंच ताराबाई बोडके, माजी उपसरपंच ज्ञानदेव मोहोळ, विद्यमान उपसरपंच स्वप्नील तुपे, माजी उपसरपंच अनंता वर्वे, राम मोहोळ, अर्जून कदम, निळू शिंदे, वसंत बोडके, भरत सुतार, पोलिस जमादार शेळके आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Usha Sutar elected unopposed Sarpanch of Tikona Gram Panchayat Maval )
अधिक वाचा –
– ‘पाणी योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करा; जनरल मोटर्स कामगारांना न्याय द्या’ : आमदार सुनिल शेळकेंची अधिवेशनात मागणी
– तुमच्या गावच्या सरपंचाला किती पगार मिळतो? पाहा ग्रामपंचायत लोकसंख्यानिहाय सरपंच-उपसरपंच यांना मिळणारे मानधन
– IPS सत्यसाई कार्तिक यांची धडाकेबाज कारवाई! कुसगावातील जुगार अड्ड्यावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, 7 जण ताब्यात