Dainik Maval News : दरवर्षी प्रमाणे यंदाही खोपोलीतील भटक्या कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्याचे अभियान व्हेटर्नरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल मुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, श्री कृपा एक्वेरियम – खोपोली, लायन्स क्लब ऑफ – खोपोली, रोट्रॅक्ट क्लब ऑफ – खोपोली आणि शहरातील प्राणी मित्रांच्या माध्यमातून राबवण्यात आले. जवळपास पंधरा दिवस खोपोली शहरातील विवीध भागात हे अभियान राबविण्यात आले आणि त्याद्वारे 700 हून अधिक भटक्या कुत्र्यांना लस देण्यात आली.
या अभियानासाठी खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत कदम, खालापूर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.काळे, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील, खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या माजी अध्यक्षा शिल्पा मोदी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेतर्फे गुरुनाथ साठेलकर आणि विजय भोसले यांच्यासह अनेक सदस्य तसेच शहरातील प्राणी मित्रांनी या मोहिमेत सहभाग घेतला. श्री कृपा एक्वेरियम चे संचालक प्रवीण शेंद्रे यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.
आंतरराष्ट्रीय रेबीज दिनाच्या निमित्ताने दरवर्षी लसीकरणाचे अभियान राबवले जाते. यंदाचे हे पाचवे वर्ष होते. मागील वर्षी जवळपास पाचशे भटक्या कुत्र्यांना लस देण्यात आली होती तर यंदा त्याहीपेक्षा जास्त संख्येने लसीकरण करण्याचा संकल्प केला गेला होता त्यानुसार यंदा या अभियानाचा शुभारंभ दिनांक 6 ॲक्टोबर 2024 रोजी झाला होता तर खोपोली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या दंशामुळे हबकलेल्या खोपोलीकरांना या निमीत्ताने काहीं प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
हिमालया हेल्दी पेट फूड, ड्रुल्स पेट फूड, ऑरेंज पेट , कार्नीवेल पेट फूड, मिस्टिक इत्यादी कंपन्यांनी या मोहिमेसाठी डॉग फूड पुरवले होते. तसेच व्हेटर्नरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातुन लसीकरणाची व्यवस्था केली गेली आणि डॉ.राहुल मुळेकर, डॉ.विष्णू काळे, डॉ.प्रशांत बिराजदार, डॉ.आसाराम काळे, डॉ.शशिकांत थोरात, सागर कसबे यांनी प्रत्यक्ष योगदान दिले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जोरदार शक्तीप्रदर्शनासह सुनिल शेळके यांचा मावळ विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, जीवाभावाचे चार सहकारी होते उपस्थित
– महाविकासआघाडी भूमिका जाहीर करणार? स्वतंत्र उमेदवार देणार की बापूसाहेब भेगडेंना पाठींबा देणार? तालुक्यात वेगळीच चर्चा
– मावळच्या राजकारणात मोठा भूकंप ! बाळा भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा, बाळाभाऊंसोबत भाजपाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे