काही दिवसांपूर्वीच वडगाव शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आता वडगाव नगरपंचायतीकडून याबाबतची पाऊले उचलली जात आहे. नगराध्यक्ष मयूर ढोरे ( Vadgaon City Mayor Mayur Dhore ) यांच्या पुढाकाराने बुधवारी (7 सप्टेंबर) शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास कारणीभूत असलेल्या विद्युत विभागाला ( Electricity Department ) काही मागण्यांसदर्भातील निवेदन देण्यात आले.
वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने वडगाव शहरातील काही भागात होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे वडगावकर नागरिक हैराण झाले असून विद्युतपुरवठा सुरळीत करण्याबाबतच्या मागणीचे पत्र वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे यांनी वडगाव येथील विद्युत महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना दिले.
वडगाव शहरातील काही भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जांभूळ बंधारावरील खंडीत होणारा विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजित वाघमारे, दिलीप म्हाळसकर, प्रविण चव्हाण, राजेश बाफणा, विशाल वहिले, संदीप ढोरे आदी उपस्थित होते.
वडगाव शहर हे मावळ तालुक्याचे मुख्यालय आहे. वडगाव नगरपंचायत कार्यक्षेत्रात सुमारे 35 ते 40 हजार लोकसंख्या आहे. तसेच शहरात सांगवी, जांभूळ, कातवी अशा तीन पाणी योजना कार्यान्वित आहे. त्यापैकी जांभूळ पाणी पुरवठा योजना ही वडगाव नजीक असलेल्या जांभूळ गावाच्या नदीवर बंधारा असलेल्या भागातून शहराला पाणी पुरवले जाते. परंतू गेल्या दीड महिन्यांपासून सततच्या खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शहरातील काही ठिकाणीचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण विभागाने लवकरात लवकर याबद्दल पाऊले उचलावीत आणि योग्य ती कार्यवाही करून याठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळाची उपलब्धता करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ( Vadgaon City Mayor Mayur Dhore Letter To Electricity Department For Power supply )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
एकविरा देवस्थानच्या ऐतिहासिक वस्तू पुरातत्व विभागाकडून देवस्थानकडे सुपूर्द करण्याची मागणी
उद्धव ठाकरेंवर प्रचंड जहरी टीका; “बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो..”