Dainik Maval News : तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यातील पाच फरारी आरोपींना येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयासमोर हजर राहावे, असा आदेश वडगाव मावळ न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.ए.माळी यांनी काढला आहे. पूनम भगवानी, रश्मी मंगतानी, राजू तनवानी, ज्योती मोतियानी आणि निखिल शर्मा अशी फरारी आरोपींची नावे आहेत.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, वरील आरोपींनी भारतीय दंड विधान कलमान्वये शिक्षा पात्र अपराध केला आहे. त्यावरुन अटक वॉरंट काढले असता वरील आरोपी सापडू शकत नाहीत किंवा या वॉरंटची अंमलबजावणी चुकविण्यासाठी ते गुप्तपणे वावरत आहेत किंवा फरारी झालेले आहेत. म्हणून जबाब देण्यासाठी या आरोपींनी येत्या ४ नोव्हेंबर रोजी वडगाव मावळ न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उपस्थित होण्यास फर्माविण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात
– निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने पक्ष, नेते, कार्यकर्ते सर्वांसाठीच नियमावली जाहीर ; वाचा नियमावली सविस्तर । Pune News
– पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर एसटी बस आणि ट्रक यांचा अपघात – एकाचा मृत्यू, इतर प्रवासी जखमी । Kamshet News