Dainik Maval News : वडगाव मावळ येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्या मंदिर, वडगाव या शाळेमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार खाडे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विध्यार्थीनी सुरेख भाषणे केली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. खाडे यांनी आपल्या भाषणात पंडित नेहरू यांच्या कार्याची माहिती दिली तसेच विध्यार्थीना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या शिक्षिका स्वाती खुडे यांनी ही आपल्या भाषणातून मुलाना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. किरण नवले, निलेश गवई, सौ. सारिका अवचरे, सौ. कीर्ती वहिले, सौ. सुमन दळवी, श्रीमती काळढोके, सौ. नांगरे, गजभिव, सौ. रेशमा गायकवाड, सौ. रीमा शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक, सूत्रसंचालन व आभार श्री. किरण नवले यांनी केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका
