Dainik Maval News : मावळ तालुक्यातील मौजे कुसवली गावच्या हद्दीत कुसवली फाट्याजवळ एका फार्म हाऊसच्या बाहेर काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती वडगाव मावळ पोलिसांना मिळाली. त्याआधारे वडगाव पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळणारे आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शनिवारी ( दि. १५ नोव्हेंबर) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वडगाव मावळ पोलिसांनी सदर ठिकाणी अचानक धाड टाकत पैशाने जुगार खेळणाऱ्या इसमांवर कारवाई करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 चे कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
1) सतिश महादेव कदम, वय 40 वर्षे, रा. खराळवाडी पिंपरी पुणे, 2) हनुमंत शंकर मोरे, वय 52 वर्षे, रा. सेक्टर 7 स्पाईन सिटी भोसरी पुणे, 3) विजय कृष्णा निमसे, वय 45 वर्षे, रा. इंद्रायणीनगर मोसरी पुणे, 4) सचीन गुलाबराब आदक, बय-53 वर्षे, रा. स्पाईन सिटी भोसरी पुणे, 5) मनोहर शंकर मोरे, वय-50 वर्षे, रा. स्पाईनसिटी इंद्रायणीनगर भोसरी पुणे, 6) संदीप नारायण फटांगडे, वय -50 वर्षे, रा. खराळवाडी पिंपरी पुणे, 7) दत्तात्रय रामचंद्र लावंड, यय-48 वर्षे, रा इंद्रायणी नगर भोसरी पुणे, 8) श्रीमंत रुपसींग राठोड, यय-48 वर्षे, रा. सदगुरुनगर भोसरी पुणे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नाव आहे.
आरोपींकडून 17,300 रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. वरील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक वडगाव मावळ अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, पोलीस हवालदार विशाल जांभळे, श्रीशैल कंटोळी, गणेश होळकर, नेहा भोर व अफसर शेख यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार संपत वायाळ हे करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका

