व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘ऐतिहासिक तळ्याभोवतीचे कठडे तातडीने दुरुस्त करा आणि तळ्याची स्वच्छता करून त्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारा’ । Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे श्री पोटोबा महाराज मंदिर परिसरात असलेले ऐतिहासिक तळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. चर्चेचे कारण म्हणजे गुढीपाडवा सणाच्या पूर्वसंध्येला याठिकाणी एका चिमुकल्याचा बुडून मृत्यू झालाय.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 13, 2024
in लोकल, मावळकट्टा, शहर
Vadgaon-Maval-Historical-Pond

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ येथे श्री पोटोबा महाराज मंदिर परिसरात असलेले ऐतिहासिक तळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. चर्चेचे कारण म्हणजे गुढीपाडवा सणाच्या पूर्वसंध्येला याठिकाणी एका चिमुकल्याचा बुडून मृत्यू झालाय. या घटनेबद्दल संपूर्ण वडगाव शहरासह मावळ तालुक्यात शोक व्यक्त केला जातोय. तसेच घटनेच्या मुळाशी जाता वडगावच्या या तळ्याची सुरक्षितता आणि झालेली दुरावस्था याबद्दल चर्चा होत आहे. जर हे तळे सुस्थितीत असते, तळ्याभोवती सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना असत्या, कठडे सुस्थितीत असते, तर कदाचित हा अपघात घडला नसता आणि चिमुकला समर वाचला असता. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

त्यामुळे ह्या अपघातानंतर तरी किमान या तळ्याबद्दल विचार होऊन त्यासाठी योग्य ती पाऊले प्रशासनाने उचलावीत अशी मागणी केली जात आहे. वडगाव मावळ शहरातील जय बजरंग तालीम मंडळाने याबाबत वडगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रवीण निकम यांना पत्र वजा निवेदन दिले आहे. त्यात, श्री पोटोबा महाराज मंदिर आवारातील या पेशवेकालीन तळ्याची तटबंदी दुरुस्ती करणे आणि सुशोभीकरण याबाबत मागणी करण्यात आली आहे. ( Vadgaon Maval Potoba Maharaj Mandir Historical Pond Need To Clean And Repair Early )

जय बजरंग तालीम मंडळाने नगरपंचायत मुख्याधिकारी प्रवीण निकम यांना लिहिलेले पत्र;
“आम्ही आपणास वरील विषयान्वये विनंती करतो की, ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर आवारामध्ये पेशवेकालीन तळे असून या तळ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सदरचे तळे ग्रामपंचायत काळात एका ठेकेदाराला भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. सबंधित ठेकेदाराने तळ्याची देखभाल, डागडुजी करणेचे ठरले होते. सबंधित ठेकेदाराच्या कराराला अनेक वर्षे झाली आहेत. तसेच ग्रामपंचायत काळात बांधण्यात आलेले कठडे तुटले आहेत व तळ्यातील पाणीही अत्यंत दूषित झालेले आहे.

चार दिवसांपूर्वी या परिसरात वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील एक लहान मुलाचा तळ्यात पडल्याने मृत्यू झाला, ही अत्यंत खेददायक बाब आहे. तळ्याचे कठडे सुस्थितीत असते तर कदाचित ही दुर्घटना टळली असती. या घटनेचा गांभीर्याने विचार करून सर्वप्रथम तळ्याच्या भोवती असलेले कठडे तातडीने दुरुस्त करावेत, अन्यथा सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करावी. तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या तळ्यात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळा उभारून सर्वासाठी दर्शनासाठी तो खुला असावा व सुशोभीकरण करून हा ऐतिहासिक ठेवा जपावा, अशी मागणी आणि विनंती आम्ही करत आहोत.”

अधिक वाचा –
– शिरगाव येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळेला 7.50 लाखाचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र प्रदान । Maval News
– मावळ लोकसभा मतदारसंघ : पहिल्यांदाच घड्याळाशिवाय होणार मावळ लोकसभेची निवडणूक । Maval Lok Sabha
– वडगाव शहर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर, शहर अध्यक्षपदी ‘यांना’ संधी । Vadgaon Maval


Previous Post

दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत मावळ भाजपाचा संवाद मेळावा संपन्न; महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन । Maval Lok Sabha

Next Post

श्री एकविरा देवी चैत्री यात्रा निमित्त पोलिसांकडून चोख बंदोबस्त; यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सुक्ष्म नियोजन – वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ekvira-Devi

श्री एकविरा देवी चैत्री यात्रा निमित्त पोलिसांकडून चोख बंदोबस्त; यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सुक्ष्म नियोजन - वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.