Dainik Maval News : मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी माजी उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली काही महिन्यांपूर्वी वडगाव शहरामध्ये प्रथमच जनसंवाद यात्रा म्हणजेच लोक संपर्क अभियान राबविण्यात आले होते.
- या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांनी वडगाव नगरपंचायतीमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सोयीसुविधांच्या संदर्भात आपल्या समस्या आणि तक्रारी म्हाळसकर यांच्यापुढे मांडल्या होत्या. त्यापैकी काही समस्यांचा म्हाळसकर यांनी जागीच निपटारा केला होता.
परंतु, उर्वरित महत्वाच्या समस्यांचे निवारण हे वडगाव नगरपंचायत मार्फत त्वरित करण्यात यावे, यासाठी म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वडगाव नगरपंचायतीच्या कार्यालयीन अधीक्षक मनिषा चव्हाण यांची भेट घेतली. त्यांच्याकडे वडगांव नगरपंचायतीच्या वतीने देण्यात येणाऱ्या मुलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत सर्व समस्या आणि अडचणी सोडविण्यासाठी त्वरीत निर्णय घ्यावा, असे लेखी निवेदन देण्यात आले.
यावेळी मनसे नेते रुपेश म्हाळसकर, तानाजी तोडकर,गणेश भांगरे, संतोष म्हाळसकर,आशिष म्हाळसकर, सुहास इंदलकर,सुहास कराळे, आदित्य म्हाळसकर, रोहित कोळी आदींजण उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway

