मुंबईतील घाटकोपर होर्डींग दुर्घटनेनंतर राज्यभरातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली. तेव्हापासून मावळ तालुक्यातील प्रमुख शहरातील प्रशासन देखील खडबडून जागे झाले असून विविध राजकीय पक्षांच्या निवेदनानंतर शहर हद्दीतील अनधिकृत होर्डींगवर कारवाईला आता सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात वडगाव नगरपंचायत प्रशासनाने शहर हद्दीतील होर्डींगचा सर्व्हे केला होता. प्रत्यक्ष पाहणी दौरा केला होता. त्यानंतर संबंधित होर्डींग धारकांना नोटीसा बजावल्या होत्या. त्यामुळे आता सोमवारपासून (दि. 21 मे) प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव नगरपंचायतीच्या वतीने शहर परिसरातील अनधिकृत होर्डिंग हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वडगाव नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत सहाय्यक नगररचनाकार लक्ष्मण माने, कार्यालयीन अधीक्षक संदीप सोनवणे, साजिद विराणी, सहाय्यक अभियंता समाधान पवार, सोमनाथ आगळे, अशोक गायकवाड आदींसह इतर नगरपंचायत कर्मचारी यांच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. ( Vadgaon Nagar Panchayat administration started demolishing unauthorized hoardings in city )
नगरपंचायतीकडून गेल्या आठवड्यातच नोटीसा –
वडगाव नगरपंचायत प्रशासनाने शहर हद्दीतील सर्व होर्डिंगची पाहणी करून अनधिकृत होर्डिंगमालकांना नोटीस दिल्या होत्या. 7 दिवसांच्या आत नवीन स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल नगर पंचायत कार्यालयास सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच अनधिकृत होर्डिंगधारकांनी विहित नमुन्यात परवानगी घ्यावी, अन्यथा अनधिकृत होर्डिंग तत्काळ काढून घ्यावे, अशाही सूचना केल्या होत्या.
यासह रस्ते विकास महामंडळाच्या हद्दीत असणाऱ्या होर्डिंगधारकांनी कार्यालयाकडून परवानगी घेतली असल्यास त्यांची एक प्रत आणि स्ट्रक्चरल ऑडिट केल्याच्या अहवालाची एक प्रत नगरपंचायत कार्यालय जमा करावी. अन्यथा शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग नगरपंचायतीमार्फत काढून टाकण्यात येईल व येणारा खर्च होर्डिंगधारकांकडून वसूल करण्यात येईल, अशा प्रकारच्या सूचना नगरपंचायत प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी कारवाई सुरु करण्यापूर्वीच दिल्या होत्या.
अधिक वाचा –
– ‘राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले असते तर…’, निकालाआधीच श्रीरंग बारणेंनी राष्ट्रवादीकडे दाखवले बोट । Maval Lok Sabha
– बारावी बोर्ड परीक्षेत करिना देवकर प्रथम, कार्ला येथील श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेजचा यंदा 94 टक्के निकाल
– काळाचा घाला ! परतीच्या मार्गावर असलेल्या तळेगाव येथील कुटुंबाचा लोणावळ्याजवळ अपघात, कारवर कंटेनर उलटला, दोघांचा मृत्यू