Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे वार्ड क्रमांक 11 मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार असणारे सुनील गणेश आप्पा ढोरे यांनी सोमवारी ( दि. 24 ) आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. श्री पोटोबा महाराज मंदिरात दर्शन घेऊन सहकाऱ्यांसमवेत प्रचाराचा आरंभ श्री ढोरे यांनी केला.
यावेळी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 11 मधील प्रमुख भाग असलेल्या बाजारपेठ आणि माळीनगर येथे सुनील ढोरे यांनी दिवसभर नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या या प्रचार रॅलीला आणि संवाद दौऱ्याला सर्वसामान्य नागरिकांचा, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
वार्ड क्रमांक 11 मध्ये सर्वात अगोदर बाजारपेठ भागात प्रत्येक व्यापारी बांधवांशी श्री सुनील ढोरे यांनी संवाद साधत, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. यावेळी व्यापारी बांधवांनी देखील त्यांचे उत्साहात स्वागत केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना विजयी होण्यासाठी आशीर्वाद देखील दिले. प्रभागातील अन्य ठिकाणी अशाच पद्धतीने नागरिकांच्या गाठीभेटी श्री. सुनील ढोरे यांनी घेतल्या.
माळीनगर येथे सायंकाळी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुनील ढोरे यांच्या प्रचार दौऱ्यास पाहायला मिळाला. यावेळी नागरिकांकडून ढोरे यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महिला भगिनींकडून त्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच आपल्या समस्यांची सोडवणूक सुनील ढोरे हेच करू शकतील, असा विश्वास देखील या ठिकाणच्या नागरिकांनी व्यक्त केला.
रविवारी आमदार सुनील अण्णा शेळके यांनी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अर्थात सोमवारी सुनील ढोरे यांनी आपल्या प्रभागामध्ये जोरदार प्रचार रॅली काढत विक्रमी मतांनी वडगावातून निवडून येण्याचा विश्वास देखील व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अनेक मान्यवर, युवा कार्यकर्ते आणि वार्ड क्रमांक 11 मधील सामान्य मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते.
केवळ निवडणूक नाही तर अन्य कालावधीमध्ये देखील श्री सुनील ढोरे आपल्या सोबत असतात, असा विश्वास काही नागरिकांनी दैनिक मावळ सोबत बोलताना व्यक्त केला. तर नागरिकांच्या समस्या सोडवण्या सोबतच या प्रभागाच्या विकासाचे स्वप्न येत्या काळात पूर्ण करणार, त्यासाठी नागरिकांनी आशीर्वाद द्यावेत, अशी प्रतिक्रिया सुनील ढोरे यांनी दिली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade
