Dainik Maval News : राज्य निवडणुक आयोगाने दिनांक 4 नोव्हेंबर रोजी वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक-२०२५ कार्यक्रम घोषित केला आहे. सदर कार्यक्रमानुसार वडगाव नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाकरिता नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याचा आजचा ( दि. १७ ) शेवटचा दिवस होता. त्यानुसार सोमवार ( दि. १७) रोजी वडगाव नगरपंचायत येथे नगराध्यक्ष पदाकरिता ५ व नगरसेवक पदाकरिता ६५ असे एकूण ७० नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले.
सोमवार अखेर नगराध्यक्ष पदासाठी (महिला) एकूण ७ महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात १) म्हाळसकर मृणाल गुलाबराव – एकूण २ पत्र, २) उदागे वैशाली पवन, ३) ढोरे अबोली मयूर, ४) सुनंदा गुलाबराव म्हाळसकर, ५) सायली रुपेश म्हाळसकर, ६) शेख नाजमाबी अल्ताफ यांच्याकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाले आहेत.
तर, नगरसेवक पदाच्या सतरा वार्डातील १७ जागांसाठी महिलांचे – ४० अर्ज व पुरुषांचे ४२ अर्ज असे एकूण ८२ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले आहेत, असे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी मुदत संपल्यानंतर एकूण ८९ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले आहेत.
प्रभाग निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :
प्रभाग क्र.१ – ४, प्रभाग क्र.२ – ६, प्रभाग क्र.३ – ७, प्रभाग क्र.४ – ३, प्रभाग क्र.५ – ६, प्रभाग क्र.६ – ६, प्रभाग क्र.७ – ६, प्रभाग क्र.८ – ४, प्रभाग क्र.९ – ८, प्रभाग क्र.१० – २, प्रभाग क्र.११ – ५, प्रभाग क्र.१२ – ३, प्रभाग क्र.१३ – ८, प्रभाग क्र.१४ – ३, प्रभाग क्र.१५ – ३, प्रभाग क्र.१६ – ५, प्रभाग क्र.१७ – ३.
वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नगरपंचायतच्या वतीने शहरातील गर्दीचे ठिकाणे महाविद्यालय येथे मतदानाचे महत्त्व पटवून मतदार प्रतिज्ञा घेऊन मतदार जनजागृती उपक्रम (SVEEP) राबविण्यात येत आहे. यामध्ये LED स्क्रीन व्हॅन द्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाचे पूर्ण आयोजन श्रीमती मनिषा तेलभाते, निवडणूक निर्णय अधिकारी व डॉ. प्रविण निकम,सहा. निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका
