Dainik Maval News : नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नामनिर्देशन प्रक्रिया दि १० नोव्हेंबर पासून सुरू झाली असून दि १४ नोव्हेंबर पर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नव्हता, मात्र शनिवारी दि १५ नोव्हेंबर २०२५ रोजी एकूण ५ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
नगराध्यक्ष पदासाठी भाजप -महायुतीच्या मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांचा एकमेव अर्ज दाखल केला आहे.
नगरसेवक पदाकरिता दाखल झालेले अर्ज —
प्रभाग क्र.५ : भाग्यश्री सतिश गाडे
प्रभाग क्र. ५ : रेखा विलास दंडेल
प्रभाग क्र. ७ : चंद्रजित दिनकर वाघमारे
प्रभाग क्र. ३ : योगेश सतीश तुमकर
एकूण ४ नगरसेवक पदांचे अर्ज आज दाखल झाले.
नामनिर्देशन दाखल करण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक नामनिर्देशन सादर करण्याची मुदत आता अंतिम टप्प्यात आली असून केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. अंतिम दिवसांत संगणक प्रणालीवर संभाव्य वाढलेल्या ताणामुळे आणि सर्व उमेदवारांना समान संधी देण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
१५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या तीनही दिवसांत – रविवार, दि. १६ नोव्हेंबर या सुट्टीच्या दिवशीसुद्धा उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार आहेत. दुपारी ३.०० वाजेपूर्वी नामनिर्देशन कक्षाच्या प्रवेशद्वाराच्या आत उपस्थित असणे बंधनकारक आहे. उमेदवारांना सोयीसाठी आयोगाने ऑनलाईन (संकेतस्थळावर) नाही तसेच ऑफलाईन (प्रत्यक्ष) दोन्ही माध्यमातून नामनिर्देशन दाखल करण्याची परवानगी दिली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका

