Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 – राज्य निवडणुक आयोगाने दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 कार्यक्रम घोषित केला आहे. सदर कार्यक्रमानुसार वडगाव नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाकरिता नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.
शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर रोजी वडगाव नगरपंचायत, वडगाव येथे नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाकरिता एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाहीत.
वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार ओळखचिठ्ठी (Voter Slip) वितरित करण्याच्या अनुषंगाने 20 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सर्व नेमणूक करण्यात आलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची बैठक मनिषा तेलभाते, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रविण निकम, सहा. निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी नगरपंचायत कार्यालयात घेण्यात आली, त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांचा “तो” शब्द इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाला देखील लागू होणार का? mla sunil shelke
– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नगरपालिका व नगरपरिषदेच्या तयारीचा घेतला आढावा । Pune News
– खामशेत येथे वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला कंटेनर, एका महिला वारकरीचा मृत्यू, 10 जण जखमी । Kamshet Accident
