Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये एकूण 19,847 मतदारांपैकी 14,554 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी 5:30 नंतर मतदानाची वेळ संपल्यानंतर समोर आलेल्या एकूण आकडेवारीनुसार वडगाव शहरात 73.33% मतदान झाले. तालुक्याची राजधानी असलेल्या वडगाव नगरपंचायतीच्या एकूण 17 वार्डातील 17 नगरसेवकांचे आणि जनतेतून निवडून येणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे भवितव्य आता ईव्हीएम मध्ये कैद झाले आहेत.
एकूण 19,847 मतदारांपैकी 14,554 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 10,184 पुरुषांपैकी 7,321 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला, तर 9,663 महिलांपैकी 7,233 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
एकूण 73.33 % मतदानाच्या टक्केवारीमध्ये पुरुष मतदानाची टक्केवारी 71.89% असून महिलांची मतदानाची टक्केवारी 74.85% इतकी आहे. एकूणच पुरुषांपेक्षा महिला वर्गाच्या मतदानाची टक्केवारी अधिक असून लाडक्या बहिणींनी सर्वाधिक मतदान केल्याचे दिसून येत आहेत. यामुळेच लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आता नक्की कोणाला मिळणार, याची चर्चा वडगाव शहरात सुरू आहे.
प्रभागनिहाय मतदानाची टक्केवारी खालील प्रमाणे ;
प्रभाग क्रमांक 1 – 68.38 %
प्रभाग क्रमांक 2 – 83.26 %
प्रभाग क्रमांक 3 – 71.38 %
प्रभाग क्रमांक 4 – 73.42 %
प्रभाग क्रमांक 5 – 73.39 %
प्रभाग क्रमांक 6 – 72.76 %
प्रभाग क्रमांक 7 – 64.76 %
प्रभाग क्रमांक 8 – 76.21 %
प्रभाग क्रमांक 9 – 72.85 %
प्रभाग क्रमांक 10 – 72.96 %
प्रभाग क्रमांक 11 – 73.66 %
प्रभाग क्रमांक 12 – 76.31 %
प्रभाग क्रमांक 13 – 77.49 %
प्रभाग क्रमांक 14 – 69.41 %
प्रभाग क्रमांक 15 – 73.21 %
प्रभाग क्रमांक 16 – 73.21 %
प्रभाग क्रमांक 17 – 74.11 %
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा निकाल
