Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीची प्रशासकीय पातळीवरील तयारी सुरू असून निवडणूक आयोगाकडून मतदार यादी कार्यक्रम पूर्ण झाला आहे. त्यानंतर आता अंतिम मतदार यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी नागरिकांना सूचना केली आहे.
या सुचनेद्वारे वडगाव शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 कामी राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाद्वारे अंतिम मतदार यादी तयार करणेत आलेली आहे. सदर अंतिम मतदार यादी ही वडगाव नगरपंचायत ची वेबसाईट npvadgaon.in व http://mahaulb.in आणि वडगाव नगरपंचायत कार्यालयात पाहणीसाठी उपलब्ध राहील.
सदर वेबसाईट वरून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार प्रतीपृष्ठ 2/- या दराने कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येईल. मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
– मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन
– लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा…
– अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी



