Dainik Maval News : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ७५० व्या जयंती निमित्त वडगाव नगरपंचायतीकडून पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगर पंचायतीचे मुख्याधिकारी प्रवीण निकम यांनी याबाबत माहिती दिली.
वडगाव शहरातील सर्व वारकरी सांप्रदाय, भाविक, नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी व मान्यवर यांना नगरपंचायत द्वारे आवाहन करण्यात येते की, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सन 2025 हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ७५० जयंती वर्ष आहे.
त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सूचनानुसार वडगाव नगरपंचायत मार्फत शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा/मूर्तीची पालखीतून मिरवणुकीचे आयोजन केले आहे. पालखी चे प्रस्थान महाराज देवस्थान मंदिर पासून ते खंडोबा मंदिर ते नगरपंचायत कार्यालय असे असणार आहे.
शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी मिरवणुकीची शोभा वाढवावी, असे आवाहन डॉ. प्रविण निकम, मुख्याधिकारी तथा प्रशासक, वडगांव नगरपंचायत यांनी केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर
