चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया कडून घेण्यात आलेल्या सी.ए. च्या फायनल परीक्षेत तळेगाव दाभाडे शहरातील कु. वैष्णवी लक्ष्मण मखर या विद्यार्थीनीने घवघवीत यश संपादन केले आहे. अभ्यासातील सातत्य, जिद्द, चिकाटी आणि सुयोग्य नियोजन यामुळे वैष्णवीने तिचे इयत्ता बारावीपासून असलेले स्वप्न अखेर साकार केले आहे. वैष्णवी अत्यंत कुशाग्र बुद्धीमत्ता असलेली आणि मेहनती विद्यार्थी असल्याचे तिचे मार्गदर्शक सांगतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वैष्णवीने आजवर यशाची अनेक यशाची शिखरे पादाक्रांत केली आहे. तिने माऊंट सेंट अॅन हायस्कूल तळेगाव दाभाडे येथे सन 2016 साली 97 टक्के मार्क मिळवून पहिला क्रमांक पटकाविला होता. तेव्हाच तीने आपल्याला सनदी लेखापाल अर्थात सी.ए. व्हायचं आहे, असा मनोदय व्यक्त केला होता. आता अखेर तिचे स्वप्न साकार झाले आहे. ( Vaishnavi Makhar From Talegaon Dabhade Passed CA Final Exam )
आपल्या यशाचे सारे श्रेय वैष्णवी तिच्या आई वडिलांना देते. वैष्णवीचे वडील लक्ष्मण मखर हे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे येथे गेली 27 वर्षं शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय ते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मावळ तालुका अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम. आय. डी. सी चे सहसचिव, मावळ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आहेत. तर तिची आई निलम मखर या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
अधिक वाचा –
– सोमाटणे येथील मुऱ्हे टोळीवर मोका अंतर्गत कारवाई । Talegaon Dabhade Crime
– उपवास म्हणजे काय ? तो का आणि कसा करावा ? आषाढी एकादशीच्या उपवासाचे महत्व, साबुदाणा खिचडी उपवासाला खरंच चालते का ? प्रत्येकाने वाचावा असा लेख
– Ashadhi Ekadashi 2024 : बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे ! मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे