वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून माधवी नरेश जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण माधवी जोशी यांच्या उमेदवारीमुळे दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांच्या मतदारांमध्ये हमखास विभागणी होणार, असा जाणकारांचा अंदाज आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मावळ लोकसभा मतदारसंघातून माधवी जोशी यांना उमेदवारी जाहीर केली असल्याचे पत्रक त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून मावळ लोकसभेसाठी उमेदवार दिला जाणार, अशी बातमी दैनिक मावळने यापूर्वीच प्रसिद्ध केली होती. दैनिक मावळच्या या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ( Vanchit Bahujan Aghadi Party Announced candidature of Madhavi Joshi in Maval Lok Sabha Constituency )
माधवी जोशी यांनी मागील वर्षीपासूनच लोकसभा निवडणूकीसाठी कंबर कसली होती. परंतू दरम्यानच्या काळात त्यांच्या कडून फारशी हालचाल दिसून आली नाही. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अर्थात शरद पवार गटात प्रवेश केल्याच्या बातम्या पुढे आल्या होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असून मावळ लोकसभेची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाली, आणि येथे संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी मिळाली.
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली.#VBAForIndia pic.twitter.com/NRofr4vlbl
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 20, 2024
दुसरीकडे महायुतीकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाली. अशात माधवी जोशी यांच्यासाठी उमेदवारीचा पर्याय उरला नव्हता. परंतू आता त्यांना वंचित बहुजन आघाडी पक्षाने मावळच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे. माधवी जोशी मावळ लोकसभेत एका प्रस्तापित पक्षाकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या पहिल्या महिला उमेदवार आहेत, ज्या घाटाखालील भागातून येतात. त्यामुळे अर्थात आता मावळ लोकसभेची निवडणूक ही चुरशीची होणार, यात शंका नाही.
माधवी जोशी यांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांच्या उपस्थितीत शनिवारी ‘वंचित’मध्ये प्रवेश केला होता. दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नव्हती. डॉ. अक्षय गंगाराम माने आणि सचिन महिपती सोनवणे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज नेला होता. परंतू आता ऐनवेळी माधवी जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. मावळमध्ये वंचितने आता मतदारांना तिसरा पर्याय दिलाय. यापूर्वी राजाराम पाटील यांनी वंचितकडून मावळ लोकसभा लढवली होती.
अधिक वाचा –
– वडगावमधील अनंता कुडे आणि डॉ. तृप्ती शहा यांना सामाजिक पुरस्कार प्रदान । Vadgaon Maval
– शिळींब येथे हॅपी स्कूल आणि हॅपी अंगणवाडी प्रोजेक्टचे लोकार्पण; विद्यार्थ्यांची पायपीट थांबावी याकरिता सायकलींचे वाटप
– मावळ विधानसभा मतदारसंघात बऊर येथील अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई । Maval Lok Sabha
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मावळ लोकसभा मतदारसंघातून माधवी जोशी यांना उमेदवारी जाहीर.#VBAForIndia pic.twitter.com/cTVbUu1Htp
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 20, 2024