Varanasi Lok Sabha Results 2024 PM Narendra Modi Wins : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. एनडीए आघाडीचे प्रमुख तथा पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या टर्मसाठी तय्यार असलेले नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून विजयाची पताका फडकवली आहे. वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा त्यांनी पराभव केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सुरुवातीला अजय राय यांनी नरेंद्र मोदी यांना कडवी झुंज दिली होती. इतकेच नाही तर स्वतः नरेंद्र मोदी हे काही काळ पिछाडीवर होते. यामुळे भाजपाच्या आणि एनडीए घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला होता. परंतू हळूहळू नरेंद्र मोेदी यांच्या मतांची बेरिज आणि लीड वाढत गेले, आणि अखेरीस आा नरेंद्र मोदी हे वाराणसी मधून विजयी झाले आहेत. ( Varanasi Election Results 2024 Live PM Narendra Modi wins with over 6 lakh votes )
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून तब्बल १ लाख ५२ हजार ५१३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांचा हा विजय नक्कीच मोठा आहे. तसेच राहुल गांधी हेही वायवाड आणि रायबरेलीतून विजयी झाले आहेत. देशात सध्या एनडीएन आणि इंडिया आघाडी यांच्यात मोठी रस्सीखेच होत असल्याचे दिसत आहे. परंतू सध्याचे निकाल पाहता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असे चित्र दिसत आहे.
अजय राय यांची कडवी झुंज –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जरी तिसऱ्यांदा वाराणसीतून विजयी झाले असले तरीही त्यांना काँग्रेसच्या उमेदवाराने चांगलीच झुंज दिली आहे. मोदींनी अजय राय Ajai Rai यांचा 1,52,513 मतांनी पराभव केला. याच पंतप्रधान मोदी PM Modi यांना 6,12,970 मते अर्थात 54.24% मते मिळाली, तर राय यांना Rai 4,60,457 मते अर्थात 40.74% मते मिळाली.
अधिक वाचा –
– भाजपाचे ‘अब की बार 400 पार’ चं स्वप्न भंगणार ? इंडिया आघाडीची जोरदार मुसंडी, काँग्रेसचं दिमाखात कमबॅक । Lok Sabha Result 2024
– लोकसभा निवडणूक निकाल : महाराष्ट्रात महाविकासआघाडीने दाखवली आपली ताकद ! महायुतीचं 45 पारचं स्वप्न लांब राहिलं
– आप्पांनी हॅटट्रीक केलीच ! मावळ लोकसभेतून श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय, संजोग वाघेरे यांचा मोठ्या फरकाने पराभव