Dainik Maval News : दिवाळी सणाला आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. तर हे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. दिवाळीत घरोघरी लावण्यात येणाऱ्या पणत्या, कंदील तसेच दिवाळीसाठी आवश्यक इतर साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत.
दसरा सण झाल्यानंतर सर्वांनाच दिवाळी सणाचे वेध लागतात. यावर्षी शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. बच्चे कंपनीपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच दिवाळी सण आवडतो. या सणाची तयारी देखील कित्येक दिवस आधी सुरु होते. घराची स्वच्छता, रंगकाम इथपासून ते दिवाळीत देवी लक्ष्मीचे आगमन होणार असल्याने आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या इत्यादी वस्तू घरात आणण्याची घाई असते.
मावळ तालुक्यातील कान्हे, टाकवे, कामशेत, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे आदी प्रमुख बाजारपेठांमध्ये दररोज सकाळ, संध्याकाळ हे साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. दिवाळीत प्लॅस्टिकचे स्वस्तिक, लक्ष्मीची पाऊले, पणत्या यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यंदा सर्वच वस्तूंचे दर जवळपास 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. महागाई असली तरीही ग्राहक वस्तू विकत घेत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात महायुतीत बंडखोरी ! सुनिल शेळके यांच्या विरोधात अनेक दिग्गज एकत्र । Maval Vidhan Sabha
– मावळ तालुक्यातील ताजे गावातील सख्ख्या भावांची शासकीय सेवेत निवड । Maval News
– राज्यात 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, विविध विभागांच्या पथकांची राज्यभर कारवाई