Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील काही भागात जीबीएस (गुलियन बॅरी सिंड्रोम) या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. दूषित पाण्यामुळे या रोगाची लागण होत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याबाबत सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर तळेगाव नगरपरिषदेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात दूषित पाण्याद्वारे आजाराची बाधा होण्याची शक्यता गृहीत धरुन दूषित पाण्याचा शिरकाव पिण्याच्या पाण्यात होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. पाण्याचे नमुने दर महिन्याला तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. जीबीएसचा संभाव्य धोका लक्षात घेता पुढील काही दिवस दर 15 दिवसाला पाण्याचे नमुने सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविणेत येणार आहे.
नगरपरिषदेमार्फत केलेल्या उपाययोजना :
1. दूषित पाण्याद्वारे आजाराची बाधा होण्याची शक्यता गृहित धरुन दूषित पाण्याचा शिरकाव पिण्याच्या पाण्यात होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.
2. पाण्याचे नमुने दर महिन्याला तपासणीकरिता सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात येतात.
3. जीबीएस चा संभाव्य धोका लक्षात घेता पुढील काही दिवस दर १५ दिवसाला पाण्याचे नमुने तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविणेत येतील तसेच शहरातील विविध भागातील पाणी नमुने तपासणीची दक्षता घेण्यात येईल.
नगरपरिषदेमार्फत नागरिकांना आवाहन :
1. शहरातील विहिरी, बोअरवेलच्या पाण्याची तपासणी करुन घ्यावी.
2. दूषित पाणी आढळल्यास तात्काळ उपाययोजना कराव्यात व नगरपरिषदेस त्वरीत कळवावे.
3. पिण्याचे पाणी उकळून गार करुन घ्यावे.
4. उघडयावरील, न शिजवलेले व शिळे अन्नपदार्थ खाऊ नये.
5. सर्व गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या नियमितपणे वर्षातून किमान तीनदा साफ व स्वच्छ कराव्यात.
6. टँकर पुरवठा धारकांनी टँकर भरण्यापूर्वी पाण्याची गुणवत्ता तपासणी करुन घ्यावी.
7. जारमधील पाण्याचा वापर करताना पाण्याची गुणवत्ता तपासणी केली असलेची खात्री करावी.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News