Dainik Maval News : दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांची पावले झेनिथ वॉटर फॉलच्या दिशेने वळणार हे गृहीत धरून त्या ठिकाणी होणाऱ्या दुर्घटनांवर प्रतिबंध आणण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. खोपोली नगर पालिका, खोपोली पोलीस स्टेशन, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि स्थानिकांच्या माध्यमातून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रयत्न केले जात आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हाधिकारी रायगड आणि रायगड पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून पर्यटन स्थळांवर पर्यटकांना येण्यास मज्जाव केला जाणार असा अंदाज जरी असला तरी कायदा पायदळी तुडवून पर्यटक हुल्लडबाजी आणि निसर्गाचा अतिरेकी आनंद घेण्यासाठी दाखल होणार आहेत हे गृहीत धरूनच खोपोली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडून झेनिथ वॉटरफॉलच्या वाटेवर ठिकठिकाणी रोप बॅरिकेडिंग केले असून अन्य उपाययोजनाही केल्या जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांनी दिली आहे.
खोपोली पोलिस स्टेशनच्या माध्यमातून हौशी पर्यटकांवरवर करडी नजर ठेवली जाणार आहे आणि कोणीही नशापाणी करून त्या ठिकाणी जाणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती पोलस निरीक्षक शितल राऊत यांनी दिली. क्यू आर कोडचे फलक ठीकठिकाणी प्रदर्शित करून पर्यटकांना आपत्कालीन प्रसंगी आवश्यक असलेल्या संपर्क क्रमांकांची माहिती त्यातून करून दिली जाणार आहे.
त्याच सोबत रेस्क्युअर्सची टीम झिरो अवर्समध्ये आपत्कालीन प्रसंगी घटनास्थळी दाखल होणार असल्याचा विश्वास अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थे कडून (HELP Foundation) व्यक्त केला जात आहे. खोपोली शहरात दाखल होणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही आपत्तीचा सामना करावा लागू नये याकरिता सर्वच यंत्रणा दक्ष असल्याचे दिसून येत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
– आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार ‘आदर्श शाळा’ ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर
– वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती