Dainik Maval News : परंदवडी (ता. मावळ) येथील श्री भैरवनाथाचे महाराजांच्या वार्षिक उत्सवानिमित्त दिनांक १५ ते १९ एप्रिल पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये पहाटे काकडा, सायंकाळी हरिपाठ विठ्ठलजप, रात्री ७ ते ९ पर्यंत कीर्तन, नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष आनंदा भोते यांनी दिली.
या हरिनाम सप्ताहात हभप शेखर महाराज जांभुळकर, हभप संतोष महाराज काळोखे, हभप दत्ता महाराज दोन्हे पाटील, हभप संगीताताई येनपुरे (चोपडे), हभप गणेश महाराज ओझरकर यांची कीर्तनसेवा होणार आहे. कीर्तन सेवेनंतर दररोज महाप्रसादाचे आयोजन केले असून पवन मावळ भागातील अनेक भजनी मंडळाकडून सप्ताहामध्ये हरीजागर करण्यात येणार आहे.
यासह रविवारी (दि.२०) व सोमवार (दि.२१) रोजी श्री भैरवनाथ महाराज उत्सव विविध धार्मिक, करमणुकीचे कार्यक्रम, कुस्ती स्पर्धा यासह ग्रामदैवताच्या छबिना पालखीच्या ग्राम प्रदक्षिणेसह संपन्न होणार आहे, अशी माहिती उत्सव समितीच्या संयोजकांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27वा गाळप हंगाम संपन्न ; 4 लाख 64 हजार पोती साखरेचे उत्पादन
– ‘मी 1 लाख 10 हजार मतांनी निवडून आलो, त्यामुळे आता 1 लाख 10 हजार झाडे लावणार’ ; आमदार शेळके यांचा संकल्प
– लोहगड किल्ल्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून अडीच कोटींचा निधी ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती । Lohgad Fort