Dainik Maval News : वडगाव मावळ शहरात शनिवारी (दि.1) श्री गणेश जयंती निमित्त ठिकठिकाणी असणाऱ्या गणेश मंदिरांमध्ये व मंडळांच्या गणपती मंदिरांच्या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील माता-भगिनी व भाविकांनी ठिकठिकाणी असणाऱ्या गणेश मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी गणेश जयंती निमित्त जन्मोत्सव सोहळा, अभिषेक, गणेश याग, भजन, प्रवचन, कीर्तन, महाप्रसाद आयोजन केले होते.
शहरातील बाल विकास मित्र मंडळाच्या वतीने श्री चिंचेच्या चिंतामणी गणपती मंदिरामध्ये महाअभिषेक, भजन, श्री गणेश जन्म सोहळा व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सायंकाळी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
भालेकर परिवार व ग्रामस्थांच्या वतीने श्री गणेश मंदिर मध्ये पूजा अभिषेक आणि महाप्रसादाचे आयोजन केले होते. क्रांती मंडळाच्या वतीने श्री गणेश मंदिरात भजन स्पर्धेचे व महाप्रसाद वाटप करण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City