Dainik Maval News : दरवर्षी लोणावळ्यात श्रोत्यांना विविध विषयावरील व्याख्यानांची पर्वणी वसंत व्याख्यानमाला समिती यांजकडून मिळत असते. याही वर्षी 21 एप्रिल पासून विविध पुष्प सुमणांची गुंफन लोणावळ्यातील रसिक श्रोत्यांना ऐकायला व अनुभवायला मिळणार आहे.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या लोणावळा नगरीत 3 मे 2003 रोजी स्वर्गीय प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली वसंत व्याख्यानमाला 23 व्या वर्षात पदार्पण करत आहे. नवनवीन वक्ते आपणासमोर सलग सात दिवस विचारधन घेऊन येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवर, विचारवंत, तज्ज्ञ साहित्यिक, कलाकार, प्रेरणादायी व्यक्तिमत्वे आपल्यासमोर मौलिक विचार मांडणार आहेत आणि संवाद साधणार आहेत.
वसंत व्याख्यानमालेचे नियोजन
सोमवार, दि. 21 एप्रिल – मधुराणी गोखले प्रभुलकर यांची प्रकटमुलाखत ‘मधुराणीचा जीवनपट ‘याविषयावर होणार असून कु. अनघाताई मोडक या मुलाखत घेणार आहेत.
मंगळवार, दि. 22 एप्रिल – प्रा. मॅक्सवेल लोपेस, वसई यांचे ‘संत मीराबाई’ याविषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
बुधवार, दि. 23 एप्रिल – डॉ. नीतिन आरेकर यांचे ‘मला भेटलेली माणसे’ या विषयावर विचारमंथन होणार आहे.
गुरुवार, दि. 24 एप्रिल – रोजी मराठी अभिनेते स्वप्निल राजशेखर यांचे ‘टोटली फिल्मी’ आणि सामाजिक बांधीलकी या विषयावर व्याख्यान होणार आहे.
शुक्रवार, दि. 25 एप्रिल – शरद कुलकर्णी, संभाजी राव गुरव, मेघा परमार आणि बाल गिर्यारोहक कु. अन्वी घाटगे यांच्याबरोबर हिमालयाची साद या विषयावर संवाद साधला जाणार आहे
शनिवार, दि. 26 एप्रिल – सुधांशु नाईक, आश्लेषा महाजन, आरती परांजपे, प्रसाद नातू यांचा ‘तेजस्वी स्वा. सावरकर यांची स्फूर्ती गाथा’ या विषयावर कार्यक्रम होणार आहे.
रविवार, दि. 27 एप्रिल – सुमधुर संगीताचा कार्यक्रम ‘गोष्ट एका राजहंसाची संगीताचा अलौकिक प्रवास’ कु. अनघाताई मोडक आणि ग्रुप सादर करणार आहेत.
श्रोत्यांना नवनवीन विषय ऐकविण्यासाठी वसंत व्याख्यानमाला समिती नेहमीच तत्पर असते. त्यामुळे लोणावळ्यातील नागरिकांसह ग्रामीण भागातील नागरिकांनीही या कार्यक्रमाचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन वसंत व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा राधिका भोंडे यांनी केले आहे.
यावर्षीच्या कार्यकारणीमध्ये स्वरूपा देशपांडे यांची अध्यक्षा म्हणून तर नितीन तिकोणे उपाध्यक्ष, सचिव वैशाली साखरेकर, सहसचिव संजय वाड, कोषाध्यक्षा चारूलता कमलवार, सह कोषाध्यक्षा संयोगिता साबळे, समन्वयक प्रशांत पुराणिक, आनंद गावडे, प्रसिद्धी प्रमुख श्रावणी कामत यांची निवड करण्यात आली असल्याचे राधिका भोंडे यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच