फक्त भारतीयच नाही तर जगभरातील क्रिकेटप्रेमींना प्रतिक्षा लागून राहिलेले विराट कोहली ( Virat Kohli ) याचे विक्रमी 71 वे शतक ( century ) अखेर आज (8 सप्टेंबर) रोजी आशिया चषक ( Asia Cup ) स्पर्धेत साकार झाले.
आशिया चषक 2022 मधील पाचवा सुपर फोर सामना भारत आणि अफगाणिस्तान ( India vs Afghanistan ) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) याच्या अनुपस्थितीत भारतीय संघासाठी विराट कोहली आणि केएल राहुल ही जोडी सलामीला आली.
बऱ्याच कालावधीनंतर सलामीला उतरलेल्या विराट कोहली याने अतिशय भन्नाट आणि झंझावाती खेळी करत आंतरराष्ट्रीय टी20 मधील त्याचे पहिलेवहिले शतक झळकावले. यासह नोव्हेंबर 2019 पासून सुरू असलेला विराटचा आंतरराष्ट्रीय शतकांचा दुष्काळ देखील संपुष्टात आला. ( Virat Kohli reached international century No 71 )
विराटने या सामन्यात एकूण अवघ्या 61 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 122 धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 6 षटकार मारले. शतक पूर्ण करण्यासाठी त्याला एकूण 53 चेंडू खेळावे लागले. ( Virat Kohli Century )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
That 71st ???? feeling ???? #AsiaCup2022 | #INDvAFG pic.twitter.com/VDoBsCGzMm
— ICC (@ICC) September 8, 2022
71 व्या शतकासाठी किती दिवस प्रतिक्षा?
विराट कोहलीचे बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 71 आंतरराष्ट्रीय शतक अखेर साकार झाले आहे. मात्र, या शतकाबाबत काही आकडेवारी समोर आली आहे.
विराट कोहलीचे 71वे शतक पण…
1020 दिवसांनंतर
2 वर्षे, 9 महिने, 16 दिवसांनंतर
33 महिने, 16 दिवसांनंतर
145 आठवडे आणि 5 दिवसांनंतर
( Virat Kohli Reached International Century No 71 In Asia Cup India vs Afghanistan )
अधिक वाचा –
बाबो..! मुलीच्या कानात गेला साप, काढताना डॉक्टरला फुटला घाम; बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
मोठी बातमी! राज्यातील तब्बल 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर, वाचा संपूर्ण कार्यक्रम