व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, January 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा । Maval News

आयरनमॅन ट्रायथलॉन ही क्रीडा स्पर्धा खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची खरी कसोटी मानली जाते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 27, 2025
in देश-विदेश, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Vishal Shete Mahesh Bhegde from Talegaon in Maval taluka won Iron Man competition in Italy

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील रहिवासी विशाल चंद्रकांत शेटे आणि महेश तानाजी भेगडे यांनी दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी इटली येथे पार पडलेल्या आयरनमॅन इटली ट्रायथलॉन या जगातील सर्वात कठीण एकदिवसीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन करत देशाचे नाव उज्ज्वल केले.

आयरन मॅन – जगातील सर्वात कठीण एकदिवसीय स्पर्धा
आयरनमॅन ट्रायथलॉन ही क्रीडा स्पर्धा खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची खरी कसोटी मानली जाते. या स्पर्धेत खेळाडूंना एकाच दिवशी, सलगपणे खालील अंतर पूर्ण करावे लागते :
1. समुद्रात पोहणे – 3.8 किमी
2. सायकलिंग – 180 किमी
3. मॅरेथॉन धावणे – 42.2 किमी

यामध्ये वेळेची मर्यादा काटेकोरपणे पाळावी लागते. पोहण्यासाठी 2 तास 20 मिनिटे, पोहणे व सायकलिंग 10 तासांत तर संपूर्ण स्पर्धा 16 तासांत पूर्ण करणे आवश्यक असते. त्यामुळे ही स्पर्धा फक्त शारीरिक ताकदीवर नव्हे तर मानसिक चिकाटी, आत्मविश्वास व धैर्यावर आधारित असते.

गुरु-शिष्य जोडीचा पराक्रम :
विशाल शेटे यांनी याआधी दोन वेळा आयरनमॅन ट्रायथलॉन यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, इटलीतील ही त्यांची तिसरी कामगिरी ठरली. तर महेश भेगडे यांनी प्रथमच या स्पर्धेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे महेश यांनी या कठीण स्पर्धेसाठी गेल्या एका वर्षभर विशाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. त्यामुळे गुरु आणि शिष्य अशी जोडी एकत्र या स्पर्धेत उतरली व दोघांनीही फिनिश लाईन पार करत इतिहास रचला.

आव्हानांनी भरलेला प्रवास :
स्पर्धेची सुरुवात सकाळी 8 वाजता समुद्रातील पोहण्याने झाली. अनपेक्षित 24 अंश सेल्सियस पाण्याच्या तापमानामुळे wetsuit legal घोषित झाले. पोहताना अनेकदा स्नायूंमध्ये क्रॅम्प्स आले तरीही त्यांनी चिकाटीने पोहणे पूर्ण केले. सायकलिंग दरम्यान प्रखर उन्हाचा तडाखा, डोंगराळ मार्ग, जोरदार हेडविंड, आणि शेवटच्या 30 किमीमध्ये प्रचंड प्रतिकूल वाऱ्याचा सामना करावा लागला. धावण्याच्या टप्प्यात म्हणजे मॅरेथॉनमध्ये मानवी मर्यादांची खरी कसोटी झाली. प्रत्येक पाऊल जड वाटत असूनही इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी शर्यत पुढे नेली.

अंतिम क्षण – तिरंग्यासह अभिमान :
या शर्यतीत विशाल शेटे यांनी 14 तास 10 मिनिटे, तर महेश भेगडे यांनी 15 तास 08 मिनिटे असा वेळ नोंदवत यशस्वीरीत्या फिनिश लाईन पार केली. शेवटच्या क्षणी दोघांनीही भारतीय तिरंगा फडकवत स्पर्धा पूर्ण केली. तो क्षण केवळ व्यक्तिगत विजय नव्हता तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा ठरला. प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या भारतीयांनी भारताचा जयघोष करत आनंदाश्रू ढाळले.

तळेगावचा अभिमान – देशासाठी प्रेरणा
ही कामगिरी फक्त दोन खेळाडूंच्या विजयापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण तळेगावचा व महाराष्ट्राचा अभिमान ठरली आहे. सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त, मानसिक ताकद आणि देशभक्तीची भावना यांच्या बळावर असामान्य वाटणारी आव्हानेही जिंकता येतात हे या दोघांनी दाखवून दिले.

तरुण पिढीसाठी ही यशोगाथा एक प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. “आयरनमॅन” हा शब्द केवळ स्पर्धेपुरता मर्यादित न राहता जिद्द, चिकाटी व मानवी क्षमतेच्या मर्यादा ओलांडण्याचे प्रतीक बनला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम


Previous Post

हजारो महिलांच्या सहभागाने मावळमध्ये पार पडला भव्य कुंकू मार्चन सोहळा ! प्रशांत दादा भागवत यांच्याकडून यशस्वी आयोजन

Next Post

मावळ तालुक्यातील टाकवे गावात आढळला ‘बॉम्बे सॅसीलियन’ नावाचा दुर्मिळ उभयचर प्राणी । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
rare amphibian named Bombay caecilian was found in Takve village of Maval taluka

मावळ तालुक्यातील टाकवे गावात आढळला ‘बॉम्बे सॅसीलियन’ नावाचा दुर्मिळ उभयचर प्राणी । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Reservation for post of Panchayat Samiti Chairman is being released today Pune

मावळ पंचायत समिती निवडणूक २०२६ : दहापैकी ‘या’ दोन गणातील उमेदवार असणार थेट सभापती पदाचा दावेदार – पाहा कुठल्या गणात कोणते आरक्षण

January 14, 2026
post of president remained out of reach Upheaval in Maval politics after Pune Zilla Parishad Group Reservation

मावळातील ‘या’ झेडपी गटाचा उमेदवार असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार – पाहा मावळात कुठल्या गटात कोणते आरक्षण

January 14, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार

January 14, 2026
Finally bugle has sounded announcement of Zilla Parishad Panchayat Samiti elections in maharashtra

अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक

January 13, 2026
Caste certificates distributed to 13 families of Thakar community in Vadgaon-Katvi through Mayor Aboli Dhore

नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या माध्यमातून वडगाव-कातवी मधील ठाकर समाजातील १३ कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप

January 13, 2026
BJP new chapter of Fear-Free Mumbai Home Minister Devendra Fadnavis Zero Tolerance policy

भाजपाकडून ‘भयमुक्त मुंबई’चा नवा अध्याय : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी आणि मुंबईकरांचा मोकळा श्वास

January 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.