मावळ लोकसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा तसेच मतदान कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मतदान सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आली असून या मतदानाचे वेळापत्रक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी जाहीर केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया ८ व ९ मे रोजी तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) ५ मे व ७ ते ९ मे दरम्यान नोंदवून घेण्यात येणार आहे. ( Voting schedule Announced for senior citizens disabled citizens in Maval Lok Sabha Constituency )
पिंपरी विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया ७ व ८ मे रोजी तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर ७ ते ९ मे दरम्यान नोंदवून घेण्यात येणार आहे, असेही मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– टिळा झाल्यावर होणाऱ्या नवऱ्याचे प्रेमसंबंध उघडकीस आल्याने तरूणीची आत्म’हत्या, मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार ! Maval Crime
– ‘मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची राहिल’ – आमदार सुनिल शेळके
– म्हाळूंगे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात गावठी दारूसह 2 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त । Pune Crime