Dainik Maval News : मावळ तालुक्यात शहर, ग्रामीण भागातील अनेक मंदिरांमध्ये सध्या पहाटेचा काकड आरती सोहळा सरु आहे. कोजागिरी पोर्णिमा झाल्यानंतर अश्विन महिन्यात काकडा आरती उत्सव चालु होतो. सुमारे एक महिना दररोज पहाटे देवाला जागवण्यासाठी मंदिरात भजन मालिकामधील काकडा आरती भजन घेतले जातात.
काकड आरतीची परंपरा आणि महत्व –
वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला प्रचंड महत्व आहे. फार पूर्वीपासून हि परंपरा चालत आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वच मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनादत असतो. कोजागरी पौणिमेपासून या काकड आरतीला सुरुवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेर्पंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो. मावळ तालुक्यातही अनेक गावांमध्ये ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. ( Warkari sampradaya kakad aarti )
चातुमार्सात भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल हे निद्रेमध्ये असतात. त्यांना उठवण्यासाठी ही काकड आरतीचे परंपरा असल्याचे बोलले जाते. आरती दरम्यान तीन मंगलाचरण, काकड आरतीचे अभंग, भूपाळ्याचे अभंग, पूजेची ओळ, सातवी मालिका, वासुदेव, आंधाळा पांगुळ, मुका, बहिरा, गौळणी आदींसह गणपतीची, भैरवनाथाची, विठ्ठलाची आरती होते. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप होते. पांडूरंगाष्टक, कालभैरवाष्टक झाल्यानंतर काकड आरतीची समाप्ती होते.
मावळ तालुका हा संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका आहे. मावळ तालुक्याला वारकरी संस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आश्विन महिन्यात महिनाभर चालणाऱ्या काकड आरतीचा गजर सध्या तालुक्यात ऐकायला मिळत आहे. बहुतांश सर्वच ठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये कोजागिरी पोर्णिमेनंतर काकड आरतीला सुरूवात होते. गावागावातील सार्वजनिक मंडळे, काकडा आरती सोहळा समिती, भजनी मंडळांसह गावांमधील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या पुढाकाराने काकडा आरतीचे नियोजन करण्यात येते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– हजारोंची गर्दी… दमदार एन्ट्री… बापूसाहेब भेगडे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज ! चार पक्षांचे तालुकाध्यक्ष उपस्थित
– मोठी घडामोड ! भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून रविंद्र भेगडे यांनीही भरला उमेदवारी अर्ज । Maval Vidhan Sabha
– उमेदवाराची ओळख : सुनिल शेळके यांचे शिक्षण किती? कौटुंबिक माहिती आणि राजकीय कारकीर्द, वाचा सविस्तर