Dainik Maval News : सह्याद्री प्रतिष्ठान मावळच्या सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ यांच्या वतीने रद्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रद्दी विका व शाळा शिकवा’ यानुसार जुन्या वह्या, पुस्तके, कोरी पाने आदी रद्दी देणगी स्वरुपात गोळा केली जाणार आहे. त्यानंतर हा निधी (पुस्तके, वह्या इ.) गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला जाणार आहे.
सदर उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत एक मोठा बॉक्स ठेवण्यात येणार आहे. तिथे संस्था, शाळा, विद्यार्थी रद्दी दान करू शकतात. अकादमीतर्फे तळेगाव, कामशेत, वडगाव, कार्ला, लोणावळा येथे हा उपक्रम राबविले जाणार आहे. गतवर्षी जवळपास १३५० किलोपेक्षा जास्त रद्दीचे संकलन करण्यात आले होते.
अकादमीच्या वतीने आयोजित रद्दी महोत्सवामध्ये जमा झालेल्या वह्या व पुस्तकांचे गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी वाटप करण्यात येईल. आपल्या परिसरातील गरजु विद्यार्थ्यांना मदत हवी असल्यास अकादमीशी संपर्क साधावा, असे आवाहन केदार डाकवे यांनी केले आहे. अकादमीचे सत्यम तिकोने, किरण ढोरे, अनिस शर्मा, अश्विन दाभाडे, चेतन वाघमारे आदींनी याचे नियोजन केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संत तुकाराम साखर कारखाना निवडणूक : नेतृत्व कायम, पण संचालक मंडळात मोठ्या बदलांचे संकेत । Sant Tukaram Sugar Factory Election
– सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल ; लोणावळा पोलिसांकडून शांतता व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 4 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली । Pune News