व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल ; लोणावळा पोलिसांकडून शांतता व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन

सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारा आक्षेपार्ह व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल करणार्‍या युवकावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.२२) गुन्हा दाखल करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 23, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Lonavla-City-Police-Station

Photo Courtesy : File Photo : Lonavla City Police Station


Dainik Maval News : सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारा आक्षेपार्ह व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल करणार्‍या युवकावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.२२) गुन्हा दाखल करण्यात आला. दोन समाजात तेढ निर्माण करणारा हा प्रकार असल्याने पोलिसांनी याची तत्काळ दखल घेत कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

शुक्रवारी या व्हिडिओविरोधात विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी शिवसेना शहर युवा सेना शाखेनेही पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये आणि औरंगजेबाच्या उदात्तीकरणामुळे शहरात तीव्र संताप व्यक्‍त केला जात होता.

  • सदरील व्हिडिओ नागपूरमध्ये झालेल्या घटनेशी साधर्म्य असलेला असून लोणावळ्यातही अशाच प्रकारे सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिक नागरिक आणि संघटनांचे म्हणणे आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी संबंधित युवकावर गुन्हा दाखल केला असून यापुढे अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. लोणावळा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सर्व समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केले असून, सोमवारी या प्रकरणावर शांतता समितीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • सामाजिक सलोखा जपा
    – धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर करू नका.
    – कोणतीही शंका असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधा.
    – शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणार्‍यांची माहिती पोलिसांना द्या.
    – सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महसूल विभागाकडून ‘जिवंत सातबारा मोहीम’ जाहीर : 7/12 उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार अन् वारसांची नावे लागणार
– वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार ; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती
– घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार मोफत वाळू देणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा


Previous Post

महत्वाची बातमी : मळवली रेल्वे गेट चार दिवस बंद राहणार, पर्यायी मार्ग वापरण्याचे नागरिकांना आवाहन । Lonavala News

Next Post

ऑनलाईन जुगारीचा गेम खेळण्याचा नादात घरफोडी ; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून लातूरमधून आरोपीला अटक । Lonavala Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
crime-arrested

ऑनलाईन जुगारीचा गेम खेळण्याचा नादात घरफोडी ; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून लातूरमधून आरोपीला अटक । Lonavala Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 18, 2026
Sant Tukaram Sugar Factory starts using Artificial Intelligence AI and Drone Technology for 2025-26 season

संत तुकाराम साखर कारखान्याकडून २०२५-२६ हंगामासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू

May 18, 2026
Spontaneous response of Vadgaonkar citizens to Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Camp

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध दाखल्यांचे वाटप

May 18, 2026
young Girl and Boy studying in Pune drowned in Shirota Dam near Lonavala Maval

पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या तरूण तरूणीचा लोणावळा जवळील शिरोता धरणामध्ये बुडून मृत्यू

May 18, 2026
House listing and census process begins in Pune district

पुणे जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात

May 17, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajasva Camp held at Talegaon Dabhade Municipal Council

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत ” छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर ” संपन्न

May 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.