Dainik Maval News : दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई-पुणे लोहमार्गावरील मळवली रेल्वे गेट पुढील चार दिवस बंद राहणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासन वरिष्ठ सेक्शन अधिकारी तळेगाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
दिनांक २६ मार्च रोजी सकाळी ९ ते २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा रेल्वे गेट बंद राहणार आहे. मळवली रेल्वे गेट मधून मळवली, कार्ला ,पाटण, भाजे या गावातील लोकांची वर्दळ असते. तसेच लोहगड किल्ला, विसापूर किल्ला परिसरात जाणारे पर्यटक यांना देखील याच रेल्वे गेटमधून जावे लागते.
दरम्यान मळवली रेल्वे गेट चार दिवस बंद राहणार असल्यामुळे स्थानिक नागरिक व पर्यटक यांची गैरसोय होणार आहे. परंतु नागरिकांनी, पर्यटकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महसूल विभागाकडून ‘जिवंत सातबारा मोहीम’ जाहीर : 7/12 उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार अन् वारसांची नावे लागणार
– वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार ; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती
– घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार मोफत वाळू देणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा