Dainik Maval News : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत रविवार (दि.9 मार्च) रोजी कुसगाव येथील धनश्री सुपर मार्केट या व्यापाऱ्याचे दुकान फोडून 8 लाख 78 हजार रुपयेची चोरी करून अज्ञात चोर पसार झाला होता. त्या अज्ञात इसमाविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा ग्रामीण पोलीसांनी कौशल्यपूर्वक तपास व संयुक्त कारवाई करून आरोपीचा शोध लावून त्यास जेरबंद केले आहे, तसेच आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ऑनलाईन जुगारीचा गेम खेळण्याचा नादाने ही चोरी केल्याचे कबुल केले आहे.
- गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा ग्रामीण पोलीस यांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर सदरहू आरोपी हा लातुर येथील बाभळगाव, शेलु येथे राहत असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या परवानगीने लातुर जिल्ह्यातील बाभळगाव येथे आरोपीचा शोध घेतला गेला. त्यावेळी आरोपी तिथे मिळुन आल्यानंतर त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली.
आरोपीचे नाव सचिन मोहन बोयणे (वय ३२ वर्षे सध्या रा. वराळे फाटा, तळेगाव दाभाडे मुळ रा. सेलू ता.जि. लातूर) आहे. त्याची चौकशी केल्यावर त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि अभिजीत सावंत, पो उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, पो हवा राहुल पवार, पो हवा राजु मोमिन, पो हवा अतुल डेरे, पो हवा मंगेश थिगळे, पो हवा सागर नामदास, पो हवा तुषार भोईटे, पो.कॉ मंगेश भगत, पो हवा विजय गाळे, पो ना सतिश कुदळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महसूल विभागाकडून ‘जिवंत सातबारा मोहीम’ जाहीर : 7/12 उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार अन् वारसांची नावे लागणार
– वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार ; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती
– घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार मोफत वाळू देणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा