Dainik Maval News : देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्त म्हणून बदली झाली आहे. याबाबतचा आदेश नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी जारी केला आहे.
देहू नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी पदी कार्यरत असताना निवेदिता घार्गे यांनी शहरातील विकास कामांना गती देण्यासाठी प्रयत्न केले. तसेच लोकप्रतिनीधींशी संवाद ठेवून शहराच्या विकासासाठी काम केले. कर वसूल, कर वाढ यासाठी उपक्रम राबविले. शहरात स्वच्छता, सुरक्षितता यासाठी कार्यक्रम राबविले. तसेच श्री संत तुकाराम महाराज संस्थान अंतर्गत होणाऱ्या यात्रा, उत्सवासाठी योग्य नियोजन करून ते पार पाडण्यासाठी सक्रीय पुढाकार घेतला.
दरम्यान नगर विकास विभागाच्या आदेशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन प्रशासन अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या झाल्या आहेत. तर एका प्रशासन अधिकाऱ्याला पिंपरी महापालिकेतच सहायक आयुक्त म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महसूल विभागाकडून ‘जिवंत सातबारा मोहीम’ जाहीर : 7/12 उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार अन् वारसांची नावे लागणार
– वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार ; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती
– घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार मोफत वाळू देणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा